पंजाबमधील ‘त्या’ महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू बलात्कार नाही तर रोड अपघातमुळे झाला; वाचा सत्य
एका महिला पोलिसांच्या मृतदेहाचे फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, पंजाबमध्ये या महिला हवालदारावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. हाथरस प्रकरणात पीडितेची भेट घेणाऱ्या राहुल गांधी यांनी काँग्रेसशासित पंजाबमध्ये लक्ष द्यावे, अशी टीका याद्वारे केली जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. कारण पंजाबमधील या महिला पोलिसाचा मृत्यू रोड अपघातामुळे झाला होता.
काय आहे दावा?
पोलिसांच्या वर्दीतील महिलेच्या मृतदेहाचा आणि तिच्या ओळखपत्राचा फोटो शेयर करून म्हटले की, “पंजाब फतेहगड चूरियन रोड यार्ड शंगना प्लेस संगतपुरा जवळील महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह सापडला. येथे राजकारण करु नका, न्याय मिळविण्यात मदत करा.”
मूळ ट्विट येथे पाहा – ट्विटर । अर्काइव्ह
फेसबुकवर याच घटनेसंदर्भात बलात्काराचा दावा करण्यात आला आहे. युजरने म्हटले की, “पंजाबमध्ये फतेहगड, चुरियन रोड यार्ड, संगतपुरा येथे महिला कॉन्स्टेबलचा बलात्कार करून खून. जात कळली कि सांगतो.”
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
पोस्टमध्ये दिलेला ओळखपत्रावर सदरील महिलेचे नाव आणि दाव्यातील ठिकाण यांच्याआधारे कीवर्ड्सद्वारे सर्च केले. त्यातून पंजाब केसरीमधील 2 ऑक्टोबर रोजीची एक बातमी आढळली.
पंजाबमधील अमृतसरजवळील संगतपुरा भागातील फतेहगड-अमृतसर रोडवर एका महिला कॉन्स्टेबलचा रोड अपघतामध्ये मृत्यू झाला होता. या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव नौमी असे होते. ती स्कुटीवरून ड्युटीवर जात असताना एका स्कॉर्पियो गाडीने तिला मागून टक्कर दिली होती.
‘दैनिक भास्कर’ आणि ‘द ट्रिब्युन’मध्येसुद्धा या घटनेची बातमी आली आहे.
मूळ बातमी येथे वाचा – पंजाब केसरी । अर्काइव्ह
फॅक्ट क्रेसेंडोने मग या घटनेचा तपास करणाऱ्या झोंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अवतार सिंह कहलोन यांच्याशी संपर्क साधला.
त्यांनी मागिती दिली की, “सोशल मीडियावर महिला कॉन्स्टेबलच्या मृत्यूविषयी चुकीचे दावे केले जात आहेत. या प्रकरणाशी बलात्कार किंवा खूनाचा काही संबंध नाही. ड्युटीवर येत असताना या महिला कर्मचाऱ्याच्या स्कुटीला स्कॉर्पियो गाडीने मागून धडक दिली. त्यामुळे त्यांचा जागवेरच मृत्यू झाला होता.”
अवतार सिंह यांनी फॅक्ट क्रेसेंडोला घटनास्थळावरील काही फोटो आणि प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या ‘एफआयआर’ची कॉपीसुद्धा पाठवली. यामध्ये कुठेही बलात्कार किंवा खूनाचा उल्लेख नाही.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, पंजबामधील संगतपुरा भागात महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू रोड अपघातामुळे झाला होता. या महिला पोलिसावर बलात्कार किंवा तिचा खून झाला नव्हता. त्यामुळे या घटनेविषयी सोशल मीडियावर केले जाणारे दावा असत्य आहेत.
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:पंजाबमधील ‘त्या’ महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू बलात्कार नाही तर रोड अपघातमुळे झाला; वाचा सत्य
Fact Check By: Agastya Deokar
Result: False