Fact Check : काश्मीरमध्ये पोलिसांकडून नागरिकांवर लाठीमार करण्यात आलाय का?

False राजकीय सामाजिक

कश्मिरमधे प्रसाद वाटप चालू आहे.इछूकांनि आस्वाद घ्यायचा असेल ……., अशी माहिती Sudarshan More यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी 

काश्मीरमध्ये खरंच नागरिकांवर लाठीमार करण्यात आला आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेतली. ही दृश्ये आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केली. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम मिळाला

ARCHIVE

या परिणामात आम्हाला अपेक्षित बाबी दिसून न आल्याने आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला त्यावेळी आम्ही काश्मीरमध्ये नुकतीच अशी घटना घडली आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी खालील परिणाम प्राप्त झाला. 

ARCHIVE

या परिणामातही काश्मीरमध्ये नुकतीच अशी कोणती घटना घडल्याचे दिसून आले नाही. त्याचवेळी आम्ही या व्हिडिओतून हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे समजू शकते का हे शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आम्हाला या व्हिडिओत खालील पोलीस ठाण्याचा नामफलक दिसून आला.

पोलीस ठाण्याचे नाव दिसून आल्यावर आम्ही ‘lathi charge in Muslim by police in gardanibagh thana’ असा शब्दप्रयोग करत याबाबत काही मिळते का हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला खालील माहिती मिळाली. 

विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना बिहारची राजधानी पाटणा येथे ऑगस्ट 2015 मध्ये घडलेली आहे. दोन वर्षापासून त्यांना मोबदला न मिळाल्याने ते आमरण उपोषणास बसले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला होता. विविध माध्यमांनी याबाबत दिलेले वृत्त आपण खाली पाहू शकता.

INDIA.COM | ARCHIVE

INDIA TV ARCHIVE

TIMES OF INDIA | ARCHIVE 

निष्कर्ष

काश्मीरमध्ये नागरिकांवर लाठीमार करण्यात आल्याचा या व्हिडिओसोबत करण्यात आलेला दावा असत्य आहे. बिहारमधील मदरशातील शिक्षकांना दोन वर्षापासून मोबदला न मिळाल्याने त्यांनी ऑगस्ट 2015 मध्ये म्हणजेच चार वर्षापुर्वी केलेल्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : काश्मीरमध्ये पोलिसांकडून नागरिकांवर लाठीमार करण्यात आलाय का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False