युक्रेन आणि रशियाचा झेंडा घेऊन जोडप्याने काढलेला हा फोटो जुना; सध्या सुरू असलेल्या युद्धाशी त्याचा संबंध नाही

आंतरराष्ट्रीय

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जगभरातून रशियाविरोधात प्रतिसाद उमटत आहे. अशा पार्श्वभूमीवर युक्रेन आणि रशियाचा झेंडा अंगावर घेतलेल्या प्रेमी युगुलाचा फोटो व्हायरल होत आहे.

या फोटोसह दावा केल जात आहे की, युक्रेन आणि रशियाचा झेंडा घेतलेले हे कपल युद्धाचा नाही प्रेमाचा संदेश देत आहेत.

दैनिक लोकमतच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो या दाव्यासह शेअर करण्यात आला आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की हा फोटो जुना आहे. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाशी या फोटोचा काही संबंध नाही. 

फेसबुकइन्स्टाग्राम

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो 2019 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

वॉशिंग्टन पोस्ट वेबसाईटवर 4 डिसेंबर 2019 रोजी या फोटोची बातमी प्रकाशित करण्यात आली होती. त्यानुसार, फोटोतील मुलीचे नाव जुलियाना कुझनेत्सोव्हा आहे. ती तिच्या प्रियकरासोबत पोलंडमध्ये एका संगीत कॉन्सर्टमध्ये गेली होती. तेथे तिला विविध देशांचे झेंडे लावलेले दिसले. 

ते पाहून तिला एक कल्पना सुचली. जुलियाना रशियाची आहे तर तिचा प्रियकर युक्रेनचा. म्हणून मग त्यांनी आपापल्या देशाचे झेंडे अंगावर घेऊन हा फोटो काढला होता. 

वॉरसॉ शहरामध्ये 27 नोव्हेंबर 2019 रोजी हा कॉन्सर्ट झाला होता. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, हा फोटो किमान दोन वर्षे जुना आहे. हा फोटो सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धा दरम्यानचा आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने रशिया-युक्रेन युद्धासंबंधी अनेक फॅक्ट-चेक केलेले आहेत. ते तुम्ही येथे वाचू शकता.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:युक्रेन आणि रशियाचा झेंडा घेऊन जोडप्याने काढलेला हा फोटो जुना; सध्या सुरू असलेल्या युद्धाशी त्याचा संबंध नाही

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Misleading