Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शैक्षणिक पात्रता काय?

False राजकीय | Political

बारावीमध्ये नापास झालेल्या मुलांनी निराश होऊ नये कारण तुमच्या पेक्षा कमी शिकलेला माणूस आज देशाचा पंतप्रधान आहे, अशी एक पोस्ट सोशल मीडियावर दिसत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

बारावीमध्ये नापास झालेल्या मुलांनी निराश होऊ नये कारण तुमच्या पेक्षा कमी शिकलेला माणूस आज देशाचा पंतप्रधान आहे, असे या पोस्टमध्ये म्हटले असल्याने मोदींचे शिक्षण किती असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे मोदींचे शिक्षण किती याचा आम्ही शोध घेतला. मोदींचे शिक्षण किती याचा शोध घेण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला भेट दिली. त्याठिकाणी आम्ही वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी नरेंद्र मोदी यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र आम्ही तपासले. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपले शिक्षण एम. ए. असे नमूद केलेले आहे.

अक्राईव्ह

दैनिक लोकसत्तानेही मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल एक वृत्त प्रसिध्द केले आहे. या वृत्तातही मोदी यांची शैक्षणिक पात्रता १९८३ साली पॉलिटिकल सायन्समधून एमए करताना मोदींनी 62.3 टक्के गुण मिळवले असल्याचे म्हटले आहे. दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात त्यांना युरोपियन राजकारण, भारतीय राजकारण विश्लेषण, राजकारणाचे मानसशास्त्र हे विषय होते. गुजरात विद्यापीठाचे कुलगुरु एम एन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार एमएच्या पहिल्या वर्षाला मोदींना 400 पैकी 237 गुण मिळाले आणि दुसऱ्या वर्षाला 262 गुण मिळाले. त्यांना 800 पैकी एकूण 499 गुण मिळाले. दरम्यान मोदी यांच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार त्यांनी दिल्ली विद्यापीठातून 1978 साली कला शाखेतील पदवी प्राप्त केली असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

अक्राईव्ह

निष्कर्ष

बारावीमध्ये नापास झालेल्या मुलांनी निराश होऊ नये कारण तुमच्या पेक्षा कमी शिकलेला माणूस आज देशाचा पंतप्रधान आहे, हा पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य असल्याचे सिध्द झाले आहे.

Avatar

Title:Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शैक्षणिक पात्रता काय?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False