पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी हे तेथील संसदेत बोलायला उभे राहिले असताना काही संसद सदस्य मोदी-मोदीच्या घोषणा देत आहेत, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी बोलत असताना खरोखरच पाकिस्तानी संसदेत सदस्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

काय आहे दावा?

पाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदीच्या घोषणा देण्यात आल्या.

Facebook | Archive

तथ्य पडताळणी

पाकिस्तानच्या संसदेच्या मोदी-मोदीच्या घोषणा देण्यात आल्या का, याचा शोध घेतला. त्यावेळी दुनिया न्यूज या पाकिस्तानी वृत्तवाहिनीचा 26 ऑगस्ट 2020 रोजीचा एक व्हिडिओ युट्यूबवर दिसून आला. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी तेथील संसदेत केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे.

https://www.youtube.com/watch?v=zBu_wR2TzFk

Archive

पाकिस्तानमधुन प्रसिध्द होणाऱ्या डॉन या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार पाकिस्तानी संसदेत फ्रान्समधील घटनांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी इस्लामफोबिया पसरविणाऱ्या देशांविरोधाच्या ठरावावर मतदानाची मागणी विरोधक व्होटिंग, व्होटिंग असे इंग्रजीत म्हणत करत होते. हा ठराव नंतर एकमताने संमत करण्यात आला.

image2 (1).png

Dawn | Archive

निष्कर्ष

पाकिस्तान संसदेत व्होटिंग व्होटिंग अशा घोषणा देण्यात आल्या. पाकिस्तानी संसदेत मोदी-मोदी अशा घोषणा देण्यात आल्याचा दावा असत्य आहे.

Avatar

Title:पाकिस्तान संसदेत मोदी-मोदी अशा घोषणा देण्यात आल्या का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False