माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल

False सामाजिक

सोशल मीडियावर माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांचे वृद्धाश्रमात निधन झाले असे वृत्त व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये टी.एन. शेषन यांच्या पत्नीचे देखील वृद्धाश्रमात निधन झाले असे म्हटले आहे. याबद्दल फॅक्ट क्रिसेंडोने सत्य पडताळणी केली.

फेसबुकअर्काईव्ह

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर माजी निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांचे वृद्धाश्रमात निधन झाले असे वृत्त पसरत आहे. याशिवाय त्यांची पत्नी यांचे देखील वृद्धाश्रमात निधन झाले असे म्हटले आहे. या विषयी सत्य जाणून घेण्यासाठी गुगलवर टी.एन. शेषन असे सर्च केले.

माजी निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांच्या पत्नीचे निधन झाले आहे, त्यांच्या पत्नीचे निधन हे 31 मार्च 2018 रोजी झाले आहे.

TIMES NOW NEWS l अर्काईव्ह

SAKSHI POST l अर्काईव्ह

अर्काईव्ह

माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन हे त्यांच्या पत्नीसोबत तीन वर्षासाठी चेन्नईतील गुरुकुलम या वृद्धाश्रमात राहण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते पुन्हा चेन्नईतील त्यांच्या घरी राहण्यासाठी आले.

NAGPUR TODAY l अर्काईव्ह

टी.एन. शेषन यांच्या पत्नी जयालक्ष्मी शेषन यांचे निधन झाले आहे. परंतू त्यांच्या पत्नी या मृत्युच्यावेऴी वृद्धाश्रमात राहत नव्हत्या. वर्तमान परिस्थितीत टी. एन. शेषन हे त्यांच्या चेन्नईतील निवासस्थानी राहत असून, ते जीवंत आहेत.

नवभारत टाइम्सअर्काईव्ह

फॅक्ट क्रिसेंडोने माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांच्याशी फोनवर संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ही संपूर्णपणे अफवा आहे, मी जीवंत असून, ठीक आहे. काही दिवसांपूर्वी मला तब्येतीचा त्रास होत होता, परंतू सध्या माझ्या आरोग्याच्या तक्रारी कमी झाल्या असून, मी व्यवस्थित आहे.

टी.एन.शेषन,
माजी निवडणूक आयुक्त,
चेन्नई.  

टी.एन. शेषन यांचे निधन या वृत्ताचे फॅक्ट चेक आज तक आणि आउटलूक आणि लेस्टली यांनीही केले आहे. वर्तमान परिस्थितीत टी.एन.शेषन हे चेन्नईस्थित त्यांच्या निवासस्थानी राहत असून, ते जीवंत आहेत.

निष्कर्ष :  टी.एन. शेषन यांचे वृद्धाश्रमात निधन झाले हे वृत्त असत्य आहे.

Avatar

Title:माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल

Fact Check By: Amruta Kale 

Result: False