शेतकऱ्यांनी जिओ कंपनीचा टॉवर जाळला म्हणून तीन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, संतप्त शेतकऱ्यांनी आतापर्यंत जिओ कंपनीचे 1500 हजार  मोबाईल टॉवर जाळले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ जुना आहे.

काय आहे दावा?

मोबाईल टॉवर जळतानाचा एक व्हिडिओ शेयर करून सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, शेतकरी बांधवांना मनापासून सलाम. आतापर्यंत शेतकऱ्यांनी 1500 जिओ टॉवरची तोडफोड करून पेटवून दिले. 

 फेसबुकआर्काइव 

तथ्य पडताळणी

व्हिडिओतील की-फ्रेम्सवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर हा व्हिडिओ तर गेल्या अनेक वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे आढळले. युट्यूबवर 20 सप्टेंबर 2017 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ खाली पाहू शकता. 


हेदेखील वाचा:

1998 साली काँग्रेसच्या काळात गोळीबारामुळे मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांचा हा फोटो आहे का?

कुंभमेळ्याचा 7 वर्षे जुना फोटो शेतकरी आंदोलनाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य


हा धागा पकडून अधिक शोध घेतल्यावर ‘न्यूज 18 हिंदी’ने प्रसारित केलेला व्हिडिओ आढळला. त्यानुसार, ही घटना उत्तराखंडमधील देहरादून शहरातील आहे. तेथील अंकित पुरम भागात 28 जून 2017 रोजी एका मोबाईल टॉवरला अचानक आग लागली होती.  

अमर उजालाच्या बातमीनुसार, ही घटना पाच वाजता घडली. शक्ती कुमार मेहता यांच्या घरावर हे मोबाईल टॉवर होते.

मूळ बातमी – न्यूज 18 हिंदी | आर्काइव 

निष्कर्ष 

यावरून स्पष्ट होते की हा व्हिडिओ शेतकऱ्यांद्वारे जाळण्यात आलेल्या जिओ टॉवरचा नाही. हा व्हिडिओ तीन वर्षांपूर्वीचा आहे. पण हेदेखील तितकेच खरे आहे की, पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी जिओ कंपनीच्या अनेक मोबाईल टॉवरची तोडफोड केली. त्याविरोधात कंपनीने कोर्टात धाव घेत सुरक्षा प्रदान करण्याची मागणी केली आहे.  

[आपल्याकडेदेखील असेच संशयास्पद मेसेज असतील तर पडताळणीसाठी ते आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॉरवर्ड करा किंवा या क्रमांकावर ‘Hi’ मेसेज पाठवून लेटेस्ट फॅक्ट-चेकसुद्धा वाचा – तेसुद्धा आपल्या आवडीच्या 8 भाषांमध्ये!]

Avatar

Title:शेतकऱ्यांनी जिओ कंपनीचा टॉवर जाळला म्हणून तीन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Milina Patil 

Result: False