मिलिंद एकबोटे यांच्या निधनाची खोटी पोस्ट व्हायरल

False राजकीय
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

सोशल मीडियावर पुण्यातील माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे यांचे निधन झाले आहे अशी पोस्ट आहे. या पोस्टबद्दल फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी केली.

फेसबुकअर्काईव्ह

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर असणाऱ्या पोस्टमध्ये माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे यांचे जबर मारहाणीत निधन असे म्हटले आहे. सर्वात प्रथम आम्ही मिलिंद एकबोटे यांना मारहाण झाली का याविषयी गुगलवर सर्च केले.

त्यानंतर मिलिंद एकबोटे यांना गोरक्षकांकडून मारहाण झाल्याची बातमी काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 08 मे 2019 रोजी अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्सअर्काईव्ह

दैनिक सकाळअर्काईव्ह

माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे यांच्याशी फॅक्ट क्रिसेंडोने याबाबत संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी मला धक्काबुक्की करण्यात आली आणि माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली, असे सांगितले. आपल्या निधनाचे वृत्त खोडसाळपणे पसरविण्यात येत असल्याचे सांगितले.

मिलिंद एकबोटे
माजी नगरसेवक, पुणे.

निष्कर्ष :  मिलिंद एकबोटे यांच्याविषयी जबर मारहाणीत मिलिंद एकबोटे यांचे निधन ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:मिलिंद एकबोटे यांच्या निधनाची खोटी पोस्ट व्हायरल

Fact Check By: Amruta Kale 

Result: False


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •