इंडोनेशिया जी-20 परिषदेत महिलेने ‘गो बॅक मोदी’चे पोस्टर दाखवले होते का? वाचा सत्य

Altered राजकीय | Political

नुकतेच इंडोनेशियामध्ये झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यात आल्याचा दावा करणारा एक कथित फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक महिला ‘गो बॅक मोदी’ असे लिहिलेले पोस्टर हातात घेऊन उभी दिसते.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

आमच्या पडताळणीत हा फोटो बनावट आढळला. मूळ फोटो अमेरिकेतील असून, त्यात मोदीविरोधी पोस्टर नव्हते. 

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टमध्ये एका महिलेने ‘गो बॅक मोदी… अगेन… गो बॅक मोदी’ असे लिहिलेले पोस्टर हातात पकडलेले आहे. युजर्स हा फोटो शेअर करून म्हणत आहेत की, “देश असो किंवा विदेश प्रत्येक ठिकाणी ‘गो बॅक मोदी’चे नारे लावले जात आहेत.” 

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हायरल फोटो रिव्हर्स ईमेजवर सर्च केले असता कळाले की, वजाहत अली नामक व्यक्तीने 30 जून 2022 रोजी या महिलेचा मूळ फोटो ट्विट केला होता. 

या फोटोत स्पष्ट दिसते की, तिच्या हातातील पोस्टरवर “Democrats and independents must unite to vote out republicans. Vote blue this November. Paid for by concerned citizen” (“डेमोक्रेटीक आणि इंडिपेंडेंटस या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन रिपब्लिक पक्षाला निवडणुकीत मात द्यावी. या नोव्हेंबर महिन्यात  डेमोक्रेटीक पक्षालाच आपले मत द्यावे.’’) असे लिहिलेले आहे. 

अमेरिकेमध्ये 8 नोव्हेंबर 2022 रोजी मध्यावती निवडणुका पार पडल्या. 

मूळ पोस्ट – ट्विटर 

व्हायरल पोस्टप्रमाणे वरील फोटोमध्ये ‘गो बॅक मोदी’ लिहिलेले नाही. तसेच मूळ फोटो जून महिन्यातील आहे. 

दोन्ही फोटोंची तुलना केल्यावर स्पष्ट होते की, व्हायरल फोटो एडिट केलेला आहे. 

अर्थात या फोटोला एडिट करून चुकीच्या दाव्यासह शेअर केले जात आहे. 

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटो बनावट असून अमेरिकेतील निवडणुकीविषयक जुन्या फोटोला एटिड करून चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:इंडोनेशिया जी-20 परिषदेते महिलेने ‘गो बॅक मोदी’चे पोस्टर दाखवले होते का? वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate  

Result: Altered