Fact Check : पंतप्रधान मोदींच्या छायाचित्राद्वारे करण्यात येत असलेला दावा किती सत्य?

Mixture आंतरराष्ट्रीय | International राजकीय | Political

शाळेत न गेल्यामुळे सावधान-विषराम मधला फरक मा. पंतप्रधानाला समजला नाही. म्हणून मुलांना संघाच्या शाखेत नाही तर शाळेत पाठवा पुढे चालून पं प्र झाला तर जगात आपल्या देशाची फोतरी होणार नाही, अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो नेमका कुठला आणि कधीचा आहे याचा आम्ही सर्वप्रथम शोध घेतला. त्यावेळी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेचा हा 2018 सालचा हा फोटो असल्याचे समोर आले. एपी या वृत्तसंस्थेने 10 जून 2018 रोजी हा फोटो टिपलेला आहे. हिंदूस्थान टाईम्सने व अन्य वृत्तपत्रांनी हे छायाचित्र प्रकाशित केलेले आहे. या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेचे काही संकेत आहेत का, याचाही आम्ही शोध घेतला तेव्हा असे कोणतेही संकेत असल्याचे आढळले नाही.

Archive

काही वृत्तपत्रांनी आणि संकेतस्थळांनी हे संग्रहित छायाचित्र शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेचे 2019 मधील म्हणून प्रसिध्द केल्याचेही दिसून येते. चीनच्या सीजीटीएन या संकेतस्थळाने शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेचा 2019 चा एक व्हिडिओ युटूयबवर अपलोड केलेला आहे. यात मोदी हे विश्राम स्थितीत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे देखील दिसत आहेत. तर व्हायरल होणाऱ्या फोटो पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे दिसत नाहीत. यावरुन व्हायरल होत असलेले छायाचित्र 2019 मधील नसल्याचेही स्पष्ट होते. जुन्या छायाचित्रात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे दिसत नाहीत.

डीएनए इंडियाने या संकेतस्थळाने शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेचा एक व्हिडिओ अपलोड केला असून यात 21 व्या संकेदाला ते सावधान तर 23 व्या संकेदाला ते विश्राम स्थितीत दिसत आहेत. ते त्यानंतर हात उंचावून अभिवादन करताना दिसतात. सर्वसाधारणपणे माध्यमांमध्ये त्यांचा 23 व्या संकेदाचे छायाचित्र प्रसारित झाल्याचे दिसत आहे.

त्यानंतर आम्ही शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेचा 2017 चा व्हिडिओ पाहिला असता त्यात आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सावधान भूमिकेत असल्याचे दिसून आले. न्यू चायना टीव्हीने 9 जून 2017 रोजी ही परिषद थेट प्रसारित केली होती. युटूयूबवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.

Archive

निष्कर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत 2019 मध्ये छायाचित्रात आणि व्हिडिओत निरीक्षण केले असता जास्तीत जास्त वेळ विश्राम स्थितीत असल्याचे दिसते. काही सेकंद ते सावधान स्थितीतही दिसत आहेत. याआधीच्या दोन परिषदांपैकी 2017 मध्ये ते सावधान स्थितीत दिसत आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत 2018 मध्ये ते विश्राम स्थितीत दिसतात. पोस्टकर्त्याने केलेला दावा त्यामुळे सिध्द करता येत नाही. त्यांनी कोणत्याही संकेतांचे उल्लंघन केलंय, असंही म्हणता येत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत पोस्टकर्त्याचा दावा संमिश्र स्वरुपाचा आढळून आला आहे.

Avatar

Title:Fact Check : पंतप्रधान मोदींच्या छायाचित्राद्वारे करण्यात येत असलेला दावा किती सत्य?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture