हा ब्राझीलमधील व्हिडियो आहे. इटलीतील कर्फ्यूशी त्याचे काही देणेघेणे नाही. वाचा त्यामागील सत्य

Coronavirus False आंतरराष्ट्रीय

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉक-डाऊन करण्यात आहेत. आतापर्यंत 20 हजारांपेक्षा जास्त लोकांचा प्राण कोविड-19 महारोगाने घेतला आहे. याचा सर्वात मोठा फटका इटलीला बसला आहे. तेथे मृतांचा आकडा दिवसागणिक शेकडोने वाढत आहे. त्यामुळे तेथील भयावह परिस्थिती दाखवण्याचा दावा करणारे अनेक फोटो आणि व्हिडियो शेयर केले जात आहे.

अशाच एका व्हिडियोमध्ये एक व्यक्ती पोलिसांना आव्हान देताना दिसतोय. पोलिस अधिकाऱ्याने त्याच्यावर बंदूक रोखलेली आहे. मग इतर पोलिस अधिकारी तेथे येतात त्याला बळाचा वापर करून अटक करतात. हा व्हिडियो इटलीमधील लॉक-डाऊनमधील असून, घराबाहेर पडणाऱ्यांना असे अटक करण्यात येत आहे, असा दावा करण्यात येत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक 

हा व्हिडियो व्हॉट्सअपवरदेखील खूप व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी तो आम्हाला पाठवून त्याची पडताळणी करण्याची विनंती केली.

88db2d4b-0f12-4b66-8b01-0e59104984ee.jpg

तथ्य पडताळणी

व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडून रिव्हर्स इमेज सर्च आणि विविध की-वर्ड्सद्वारे शोध घेतला असता नॅशनल फाईल या वेबसाईटवर या व्हिडियोविषयी माहिती मिळाली. यात म्हटले की, हा व्हिडियो ब्राझीलमधील आहे. मद्याच्या नशेत झिंगणारा व्यक्ती पोलिस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्र घेऊन चालून गेला असता पोलिसांनी त्याला अटक केली.

Brazil-2.png

मूळ बातमी येथे वाचा – नॅशनल फाईल

याच बातमीमध्ये इस्टाडो या पोर्तुगीज भाषेतील वेबसाईटवरील बातमीचा उल्लेख आहे. 20 मार्च रोजीच्या या बातमीत हा व्हिडियो ब्राझीलमधील साऊ पाऊलो शहरातील असल्याचे म्हटले आहे. मिलिटरी पोलिसातील अधिकाऱ्याने अटक केल्याचा हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर मिलिटरी पोलिसांनी यासंबंधी तपास केला. त्यातून निष्पण्ण झाले की, सदरील व्यक्ती नशेत चाकूने लोकांना त्रास देत होता. तेव्हा मिलिटरी पोलिसांनी त्याला पडण्यासाठी ही कारवाई केली होती.

Video-1.png

मूळ बातमी येथे वाचा – इस्टाडो

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, सदरील व्हायरल व्हिडियो इटलीमधील नाही. हा व्हिडियो ब्राझिलमधील असून त्याचा कोरोना व्हायरस किंवा लॉक-डाऊनशी काही संबंध नाही.

Avatar

Title:हा ब्राझीलमधील व्हिडियो आहे. इटलीतील कर्फ्यूशी त्याचे काही देणेघेणे नाही. वाचा त्यामागील सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False