कर्नाटकातील धबधब्याचा व्हिडिओ मध्यप्रदेशातील भेडा घाटचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False राष्ट्रीय सामाजिक

मध्य प्रदेशातील जबलपूर, भेडा घाट येथील नर्मदा नदीचे विहंगमय द्दश्य म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील भेडा घाट येथील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

मध्य प्रदेशातील भेडा घाट येथील हा धबधबा आहे का, हे जाणुन घेण्यासाठी या व्हिडिओतील काही द्दश्ये रिव्हर्स इमेज केली. त्यावेळी जो परिणाम मिळाला त्यात ही द्दश्ये कर्नाटकातील जॉग धबधब्याची असल्याचे दिसून आले. गतवर्षी म्हणजेच 2019 मध्ये हा व्हिडिओ युटूयूबवर अपलोड करण्यात आला असल्याचे दिसून आले.

संग्रहित

त्यानंतर दैनिक लोकसत्ताने त्यांच्या अधिकृत युटूयूब चॅनलवर ऑगस्ट 2019 मध्ये हा व्हिडिओ अपलोड केला असल्याचे दिसून आले. दैनिक लोकसत्ताने याबद्दल माहिती देताना कर्नाटकमधील जोग धबधब्यांचे हे विहंगमय द्दश्य असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीप्रमाणे कर्नाटकातही त्यावेळी मुसळधार पाऊस कोसळत होता, याची माहितीही याठिकाणी देण्यात आली आहे.

खालील तुलनात्मक छायाचित्रामध्ये मध्य प्रदेशातील भेडा घाट आणि कर्नाटकातील जोग धबधबा यातील फरक पाहू शकता.

dd.png

निष्कर्ष

या माहितीतून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील भेडा घाट येथील असल्याचे असत्य आहे. ही द्दश्ये कर्नाटकातील जोग धबधब्याची आहेत.

Avatar

Title:कर्नाटकातील धबधब्याचा व्हिडिओ मध्यप्रदेशातील भेडा घाटचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False