तथ्य पडताळणी : अजित पवारांनी दिली का गावचे पाणी तोडण्याची धमकी

Mixture/अर्धसत्य राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सुप्रिया सुळेंना मतदान करा, अन्यथा गावाचे पाणी तोडू अशी धमकी अजित पवारांनी दिल्याची पोस्ट निवडणूक काळात सोशल व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

अजित पवारांनी खरंच असं काही वक्तव्य केलंय का?, केलं असल्यास कधी असा प्रश्न याचा शोध घेताना होता. आम्ही हे वृत्तपत्राचे कात्रण पाहिल्यावर आम्हाला हे दिव्य मराठी या वृत्तपत्राचे असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यानंतर आम्ही ते कोणत्या तारखेचे आहे हे तपासण्याचा प्रयत्न केला असता ते एप्रिल महिन्यातील असल्याचे लक्षात आले. दिव्य मराठीच्या ई-पेपर सेक्शनमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी जानेवारी 2018 पर्यंतचे अंकच आम्हाला दिसून आले. एप्रिल महिन्या अंकात हे वृत्त आम्हाला दिसून आले नाही. त्यानंतर आम्ही आमचा शोध पुढे नेला. त्यावेळी आम्हाला 19 एप्रिल 2014 चे वृत्त दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ अस्पष्ट असल्याने त्याची सत्यता तपासणार असल्याचेही पोलिसांनी या वृत्तात म्ह्टले आहे.

अक्राईव्ह

साताऱ्याहून प्रसिध्द होणाऱ्या दैनिक ऐक्यने 19 एप्रिल 2014 रोजी याबाबतचे वृत्त दिले आहे. स्वत: अजित पवार यांनी व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या घटनेचा इन्कार केला असून या ध्वनिचित्रफितीचा आवाज अजित पवार यांचा नाहीच, असा दावा केला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही विरोधकांनी केलेले आरोप खोटे असल्याचे सांगून अजित पवार यांची पाठराखण केली आहे, असे ऐक्यने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. 

अक्राईव्ह लिंक

दैनिक ऐक्यच्या संकेतस्थळानेही हे वृत्त प्रसिध्द केले आहे.

अक्राईव्ह

मावळचा नवीन साप्ताहिक अंबरनेही याबाबतचे वृत्त दिले आहे. याप्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महादेव जानकर यांनी केला असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

अक्राईव्ह

अजित पवार यांनी स्वत: माझा आवाज काढून माझ्या बदनामीचा प्रयत्न होत असल्याचे या व्हिडिओबद्दल म्हटलेले आहे. वेब दुनिया या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिलेले आहे.

अक्राईव्ह

निष्कर्ष

सुप्रिया सुळेंना मतदान करा, अन्यथा गावाचे पाणी तोडू अशी धमकी अजित पवारांनी दिल्याचे वृत्त 2014 मधील आहे. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने ते आता पुन्हा पसरविण्यात येत आहे. या ध्वनिचित्रफितीविषयी अजित पवार यांच्याकडून साशंकता व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांनी हा व्हिडिओ अस्पष्ट असल्याचे म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट संमिश्र स्वरुपाची आढळली आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : अजित पवारांनी दिली का गावचे पाणी तोडण्याची धमकी

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •