Fact Check : किंगफिशरने खरोखरच इस्टंट बिअर बनवली आहे का? जाणून घ्या सत्य

False सामाजिक

आता बिअर टेट्रा पॅकमध्ये उपलब्ध आणि आता बाटलीची झंझट नाही, कधीही कोठेही खिशातील एका कोपऱ्यात 50 बिअर ठेवा आणि कधीही कोठेही कितीही बिअर प्या, नो टेन्शन तीही किंगफिशर बिअर प्या अशी माहिती देत शिवाप्रसाद राव करानाथ आणि जनतेचा जनदूत यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Archive  

तथ्य पडताळणी

किंगफिशरने खरोखरच अशी इस्टंट बिअर बनवली आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम किंगफिशर बिअर बनविणाऱ्या युनायडेट ब्रिवेरी या कंपनीच्या संकेतस्थळास भेट दिली. या संकेतस्थळावर आम्हाला कंपनीच्या विविध उत्पादनांची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही याबाबत आणखी शोध घेतला त्यावेळी आम्हाला किंगफिशरचा 3 एप्रिल 2019 रोजीचा एक व्हिडिओ आम्हाला दिसून आला. 

Archive

त्यानंतर आम्ही युनायडेट ब्रिवेरीच्या व्यवस्थापकांशी याबाबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, एप्रिल फुल करण्यासाठी हा व्हिडिओ विनोद म्हणून निर्मित करण्यात आला होता. याच पध्दतीने गतवर्षी April Fool’s Day साठी किंगफिशरची  फिटनेस ब्रॅन्ड जाहिरात बनविण्यात आली होती. 

Archive 

किंगफिशरद्वारे बनविण्यात आलेल्या या व्हिडिओतही स्पष्ट दिसून येते की, किंगफिशरद्वारे हा व्हिडिओ एप्रिल फुलच्या विनोद निर्मितीसाठी तयार करण्यात आला होता. अनेकांना मात्र ही बाब सत्य वाटल्याने ती सत्य म्हणूनच समाजमाध्यमांमध्ये पसरत आहे.

निष्कर्ष 

समाजमाध्यमांमध्ये करण्यात येत असलेला किंगफिशरने इस्टंट बिअर बनविला असल्याचा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीत असत्य आढळला आहे. हा व्हिडिओ एप्रिल फुलच्या विनोद निर्मितीसाठी तयार करण्यात आला होता.

Avatar

Title:Fact Check : किंगफिशरने खरोखरच इस्टंट बिअर बनवली आहे का? जाणून घ्या सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False