मत मागायला आलेल्या भाजपच्या लोकांना बेदम मारहाण : सत्य पडताळणी

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक भाजपच्या नेता, कार्यकर्त्यांना मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडिओ संदर्भात व्हायरल होतांना असे म्हटले आहे की, मत मागायला आलेल्या भाजपच्या लोकांना बेदम मारहाण करणाऱ्या जनतेचा जाहीर निषेध! व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बिचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. या व्हिडिओची फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत व्हायरल व्हिडिओ मनसे वृत्तांत अधिकृत या फेसबुक पेजवरुन1 हजार 41 वेळा शेअर झाला असून, 2 हजार 300 वेळा लाईक आणि 274 कमेन्टस् मिळाले आहेत.

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ हा मनसे वृत्तांत अधिकृत या फेसबुक पेजवरुन 22 मार्च 2019 रोजी व्हायरल झाला आहे.

फेसबुक

अर्काईव्ह

याशिवाय खाली दिलेल्या विविध फेसबुक पेजवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भाजपच्या लोकांना बेदम मारहाण या व्हायरल व्हिडिओमध्ये जेव्हा काही लोक भाजप नेते आणि कार्यकर्ते यांना मारहाण करत होती तेव्हा मारतांना गोरखा लोगो को क्या ऐसा समझते हो क्या? गोरखालॅंड आणि इतर गोष्टींबद्दल ओरडत मारहाण केली जात होती. हाच मुद्दा पकडून फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी केली. गुगलवर बीजेपी लीडर्स बीटन बाय गोरखा असे सर्च केल्यानंतर खालील रिझल्ट समोर आले.

या विषयावर येणाऱ्या बातम्या आणि त्यांचा तपशील पाहता ही घटना 2017 च्या

ऑक्टोबर महिन्यातील आहे.

काय आहे नेमकी ही घटना?

दार्जिलिंग येथे पश्चिम बंगाल भाजप प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष, त्यांच्या समर्थकांना गोरखा लोकांनी मारले आहे. ही घटना 05 ऑक्टोबर 2017 रोजी घडली आहे. भाजप नेते दिलीप घोष जेव्हा दार्जिलिंग येथे गेले असतांना गोरखालॅंडच्या समर्थकांनी भाजपचे नेते दिलीप घोष, त्यांच्या कार्यकत्यांना मारहाण केली. या विषयावर विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.  

टाईम्स ऑफ इंडियाअर्काईव्ह

इंडियन एक्सप्रेसअर्काईव्ह

द इकोनॉमिक टाईम्सअर्काईव्ह

या विषयावर युट्यूबवर एबीपी न्युज या चॅनलकडून 6 ऑक्टोबर 2017 रोजी बातमी अपलोड करण्यात आली आहे.

अर्काईव्ह

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ संदर्भात संशोधन केल्यानंतर असे आढळून आले की, भाजप लोकांना मारहाण करण्यात आले हे खरे आहे. परंतू हे मारहाण आता मत मागण्यासाठी गेल्यावर केलेले नाही. व्हायरल होणारा व्हिडिओ हा आक्टोबर 2017 या वर्षामधील आहे. दार्जिलिंगमधील चौक बाजार येथे गोरखा जनमुक्ती मोर्चा आंदोलनाचे लीडर बीनय तमांग आणि त्यांच्या समर्थकांनी 5 आक्टोबर 2017 रोजी पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, भाजप कार्यकर्ते यांना मारहाण केली आहे.

निष्कर्ष : व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ संदर्भात असे म्हटले आहे की, मत मागायला आलेल्या भाजपच्या लोकांना बेदम मारहाण करणाऱ्याजनतेचा जाहीर निषेध! सर्व तथ्यांचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले की, या विषयाचा मुळ व्हिडिओ हा ऑक्टोबर 2017 मधील असून, गोरखालॅंडच्या समर्थकांनी भाजप नेते, कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे. पण भाजपचे हे नेते मत मागायला आले नव्हते. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओसंदर्भात मत मागायला आलेल्या भाजप लोकांना बेदम मारहाण हा दावा असत्य आहे. निवडणुकीच्या कालावधीत हा व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात येत असल्याचेही दिसून येत आहे.

Avatar

Title:मत मागायला आलेल्या भाजपच्या लोकांना बेदम मारहाण : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •