नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावावर लैंगिक आरोप झाले आहेत; नवाजुद्दीनवर नाही. वाचा सत्य

False सामाजिक

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे नाव सध्या वादात सापडले आहे. नुकतेच त्याच्या 21 वर्षीय पुतणीने नवाजुद्दीनच्या भावावर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ही बातमी देताना मीडियातील काही वेबसाईट्सकडून एक चूक झाली. ती चूक म्हणजे, माध्यमांनी नवाजुद्दीनवरच पुतणीने आरोप केल्याचे म्हटले.

न्यूज-18 लोकमत वृत्तस्थळानेही अशीच बातमी दिली. ‘पुतणीने नवाजुद्दीनवर लावले गंभीर आरोप’, असे न्युज-18 लोकमतच्या 3 जून रोजीच्या बातमीचे शीर्षक आहे. बातमीत म्हटले की, नवाजुद्दीनच्या पुतणीने त्याच्यावर विनयभंगाचा गंभीर आरोप केला. संपूर्ण बातमीचा रोख हा नवाजुद्दीनवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले असा आहे.

Lok18.png

मूळ बातमी येथे वाचा – न्यूज18 लोकमतअर्काइव्हफेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

या प्रकरणासंबंधी शोध सुरू केल्यावर न्यूज-18 समुहाच्या इंग्लिश वेबसाईटवरील बातमी आढळली. यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की, नवाजुद्दीच्या पुतणीने नवाजुद्दीनच्या भावाविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार पीडितेने आरोप केला की, ती जेव्हा नऊ वर्षांची होती तेव्हा नवाजुद्दीनच्या लहान्या भावाने तिच्याशी लैंगिक गैरवर्तन केले होते.

News18Eng.png

मूळ बातमी येथे वाचा – न्यूज18 लोकमतअर्काइव्ह

न्यूज-18 समुहाने दिलेल्या मराठी व इंग्लिश बातमीमध्ये ‘ई-टाईम्स’ या वेबसाईटचा दाखला दिलेला आहे. ‘ई-टाईम्स’ हे टाईम्स ऑफ इंडिया समुहाचे पोर्टल आहे. त्यावरील बातमी तपासली असता त्यातदेखील पीडित पुतणीने नवाजुद्दीनच्या भावावर आरोप केल्याचे म्हटले आहे. 

ETiems.png

मूळ बातमी येथे वाचा – ई-टाईम्सअर्काइव्ह

या पीडित पुतणीने ‘पिंकविला’ या वेबसाईटला मुलाखत दिली. त्यात तिने सांगितले की, नवाजुद्दीनचा लहाना भाऊ मिनाजुद्दीन सिद्दीकी याने तिच्यावर अत्याचार केला होता. या मुलाखतीमध्ये तिने या संपूर्ण प्रकराबद्दल माहिती दिली आहे. यात तिने म्हटले की, मिनाजुद्दीनने केलेल्या अत्याचाराविषयी जेव्हा तिने नवाजुद्दीनेला सांगितले तेव्हा त्याने दुर्लक्ष केले. खाली दिलेल्या व्हिडियोमध्ये तुम्ही ही मुलाखत पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, नवाजुद्दीनच्या पुतणीने नवाजुद्दीनचा भाऊ मिनाजुद्दीन याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. न्यूज-18 लोकमतने मात्र नवाजुद्दीनवरच आरोप झाल्याची चुकीची बातमी दिली. या चुकीच्या बातमीमुळे वाचकांमध्ये नवाजुद्दीनविषयक असत्य माहिती पसरत आहे.

Avatar

Title:नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावावर लैंगिक आरोप झाले आहेत; नवाजुद्दीनवर नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False