FACT CHECK: बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी खरंच काँग्रेस पक्षात प्रवेश केला का?

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचे बंधू असणाऱ्या आनंदराज यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या अनेक मराठी-इंग्रजी मीडियाने दिल्या. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

महाराष्ट्र टुडे या वेबसाईटने 4 मे रोजी बातमी दिली की, आनंदराज यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रकाश आंबेडकरांसाठी मोठा धक्का आहे. तसेच केवळ काँग्रेस पक्षच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न पूर्णत्वास नेऊ शकतो, असं आनंदराज यांनी पक्षप्रवेशानंतर म्हटल्याचे बातमीत म्हटले आहे.

बातमीत पुढे म्हटले की, आनंदराज यांनी दिल्लीतल्या सातही लोकसभा मतदारसंघातले उमेदवार मागे घेतले. यावर शीला दीक्षित म्हणाल्या की, आनंदराज यांच्या प्रवेशामुळे दिल्लीत काँग्रेसची ताकद वाढली.

मूळ बातमी येथे वाचा – महाराष्ट्र टुडेअर्काइव्ह

महाराष्ट्र टुडेच्या फेसबुक पेजवरूनदेखील ही बातमी शेयर करण्यात आली आहे.

फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

याबाबत शोध घेतल्यावर एनडीटीव्हीसह इतर इंग्रजी वेबसाईटवर अशा आशयाच्या बातम्या आढळल्या. दैनिक सामनानेदेखील रविवारी आनंदराज आंबेडकर यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षाला आपला पाठींबा जाहीर केल्याची बातमी दिली आहे. यामध्ये म्हटले की, रिपब्लिकन सेनेचे दिल्ली प्रमुख राकेश प्रजापती यांनी शनिवारी दिल्लीत काँग्रेस पक्षाला रिपब्लिकन सेनेचा पाठींबा जाहीर केल्याचे पत्र दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना दिले.

मूळ बातमी येथे वाचा – एनडीटीव्हीअर्काइव्ह

ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरल्यानंतर स्वतः आनंदराज आंबेडकर यांनी स्वतः खुलासा केला की, ही बातमी खोटी आहे. टीव्ही-9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची बातमी तथ्यहिन असल्याचे सांगितले. “मी आठ दिवसांपासून मुंबईतच असून, मी दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला ही बातमी धदांत खोटी आहे. अशी फेक न्यूज पसरविणाऱ्या मीडिया कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांनी दिल्लीत त्यांचा कोणताही उमेदवार उभा नव्हता. त्यामुळे उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.

सकाळशी बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणारी कार्यकारिणी मी तत्काळ बरखास्त केली आहे. माझ्या प्रवेशाचे वृत्त पसरविणाऱ्या संबंधित वृत्तपत्राविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे

दिव्य मराठी दैनिकाने वंचित बहुजन आघाडीचा खुलासा दिला आहे. त्यात म्हटले की, आनंदराज आंबेडकरांची काँग्रेस प्रवेशाची बातमीला कोणताही आधार नाहीये. बातमी प्रकाशित करणाऱ्या वृत्तसंस्थांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकू. काँग्रेस प्रवेश करणारे उदितराज आहेत, आनंदराज नाही.

मूळ बातमी येथे वाचा – दिव्य मराठीअर्काइव्ह

द हिंदू या इंग्रजी दैनिकानेदेखील आनंदराज आंबेडकरांचा खुलासा प्रसिद्ध केला आहे. तसेच आधी बातमी दिलेल्या अनेक वेबसाईटने ही बातमी मागे घेत डिलीट केली आहे (लोकसत्ता).

निष्कर्ष

आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसपक्षात प्रवेश केल्याची बातमी खोटी असल्याचे स्वतः आनंदराज यांनीच सांगितले आहे. त्यामुळे ही बातमी असत्य ठरते.

Avatar

Title:FACT CHECK: बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी खरंच काँग्रेस पक्षात प्रवेश केला का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •