महाराष्ट्र टाइम्सने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हुंड्यामध्ये दुचाकी मागितल्याने सासऱ्याने नवरदेवाला चप्पलेने मारले असे म्हटले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील घटना खरी नाही. हा स्क्रिप्टेड व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

व्हिडिओसोबत लिहिलेले आहे की, हा व्हिडिओ आयपीएस आरके विज यांनी @ipsvijrk या आयडी वरून शेअर केला आहे.

युजर्स व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, "बाईक मागणाऱ्या नवरदेवाची भर मांडवात धुलाई, सासऱ्याने चपलेने बदडले."

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आयपीएस आर के. विज यांच्या ट्विटर अकांउटवर व्हायरल व्हिडिओ शेअर केला आढळला, सोबत कॅप्शनमध्ये लिहिलेले होते की, “हुंड्याचा विरोध करा, परंतु, या पद्धतीचे समर्थन नाही!” या ठिकाणी कोणतीही अधिक माहिती उपलब्ध नव्हती.

पुढे रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर युट्यूबवर “मैथिली बाजार” नावाच्या चॅनलवर 8 मे 2021 रोजी हाच व्हिडिओ पोस्ट केल्याचे आढळले.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेले "अखेर पाठवणीच्यावेळी वधूने वराला का मारले आणि वधूच्या वडिलांनी वराला का मारले?"

https://youtu.be/50zsXVf6-L8

व्हिडिओसोबतच्या माहितीमध्ये लिहिले आहे की, अभिनेता सुनील सुमन व मोहन मंडल आणि अभिनेत्री पूजा मिश्रा आहेत.

चॅनलच्या माहितीत आढळले की, हे चॅनेल मैथिली भाषेतील (बिहार आणि झारखंडमध्ये बोलली जाणारी भाषा) आहे. जिथे मैथिली भाषेतील मनोरंजक विनोदी व्हिडिओ पोस्ट केले जातात.

इन्स्टाग्रामवर मैथिली बाजारचे पेज आढळले, यामध्ये ‘सरोज सुमन’ या व्यक्तीचे हे पेज आहे. 

पुढे बायोमध्ये “मैथिली बाजार” हे यूट्यूब कॉमेडी चॅनल असून हिंदी, भोजपूरी आणि मैथिली भाषेत मनोरंजनात्मक व्हिडिओ अपलोड केले जातात, असा उल्लेख आढळतो.

निष्कर्ष

यावरुन स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओमधील घटना खरी नाही. हा स्क्रिप्टेड व्हिडिओ आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:Scripted Video: हुंड्यामध्ये दुचाकी मागितल्याने सासऱ्याने नवरदेवाला चप्पलने मारले

Written By: Sagar Rawate

Result: False