“राजीव गांधींना मारलं नसतं तर काँग्रेसला तेव्हा सत्ता मिळाली नसती” असं काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर म्हणाले का?

Mixture/अर्धसत्य राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सोशल मीडियावर सध्या काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांचा 15 सेकंदाचा इंग्रजी भाषेतील मुलाखतीचा  व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ संदर्भात पोस्टमध्ये राजीव गांधी ला मारलं नसतं तर काँग्रेस ला तेव्हा सत्ता मिळाली नसती, असं मी नाही मणिशंकर अय्यर म्हणतोय असे लिहिलेले आहे. काय खरेच मणीशंकर अय्यर राजीव गांधींना मारलं नसतं तर काँग्रेसला तेव्हा सत्ता मिळाली नसती असे म्हणाले का? फॅक्ट क्रिसेंडोने याविषयी सत्य पडताळणी केली.

फेसबुकअर्काईव्ह

पोस्टमध्ये काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांचा इंग्रजी भाषेतील एका मुलाखतीचा 15 सेकंदाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये ” I think the figures show that had Rajiv ji not been assassinated in the middle of the election Congress party would not have won a majority, In fact it did not even win majority despite his assassination” असे इंग्रजीतील मुलाखतीचे 15 सेकंदाचे वक्तव्य आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या संदर्भात राजीव गांधी ला मारलं नसतं तर काँग्रेस ला तेव्हा सत्ता मिळाली नसती, असं मी नाही मणिशंकर अय्यर म्हणतोय असे लिहिलेले आहे.

पोस्टमध्ये मणीशंकर अय्यर यांच्या इंग्रजीतील 15 सेकंदाच्या व्हिडिओबद्दल राजीव गांधींना मारले नसते तर काँग्रेसला तेव्हा सत्ता मिळाली नसती असा दावा मणीशंकर अय्यर यांच्या नावाचा वापर करुन करण्यात आलेला आहे.

व्हायरल व्हिडिओ संदर्भात गुगलवर मनीशंकर अय्यर इंटरव्हयू असे सर्च केले. पोस्टमधील मुळ व्हिडिओ शोधण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडोने युट्युबवर मणीशंकर अय्यर इंटरव्हयू असे सर्च केले. त्यानंतर पोस्टमध्ये व्हायरल होणाऱ्या 15 सेकंदाच्या वक्तव्याचा मुळ व्हिडिओ समोर आला. युट्युबवर वाईल्ड फिल्म्स इंडिया या चॅनलवर 26 जून 2018 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण मुळ व्हिडिओ पाहू शकता.

या व्हिडिओमध्ये 5.29 मिनिटांपासून राजीव गांधी यांचा 1991 मध्ये राजकारणातील प्रवेश याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. मणीशंकर अय्यर यांना राजीव गांधी यांच्याबद्दल खालील प्रश्न विचारला होता.

You know in 1991  Elections when they were call AND the campaigning is going on, there was A perceptions that he was ON A come back trail.  would you agree with that assessment and what was the reason why people thought he was on a come back trail?

त्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी सविस्तर उत्तर दिले होते. या उत्तरात मणीशंकर अय्यर यांनी असे म्हटले की, 1991 च्या निवडणूकीनंतर समोर आलेल्या आकड्यानुसार काँग्रेसला संपुर्ण बहुमत मिळणे हे कठिणच होते. राजीव गांधी यांच्या हत्येनंतरही काँग्रेसला संपुर्ण बहुमताचा आकडा पुर्ण करुन सत्ता स्थापन करणे कठिण होते. राजीव गांधी यांची हत्या झाली त्यावेळी सहानुभुतीच्या लाटेचा परिणामामुळे काँग्रेस अनेक जागांवरुन निवडून आली. परंतू तरीही काँग्रेस पक्षाला संपुर्ण बहुमताचा आकडा गाठता आलेला नव्हता.

काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी राजीव गांधी यांची हत्या झाली नसती तर काँग्रेसला सत्ता मिळणे कठिण होते असे म्हटले होते. परंतू त्याच वाक्याच्यापुढे त्यांची हत्या झाल्यानंतरही काँग्रेसला पूर्ण बहुमताची सत्ता स्थापन करणे अवघड होते असे म्हटले आहे.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केवळ 15 सेकंदाचा मणीशंकर अय्यर यांचा इंग्रजी वक्तव्याचा व्हिडिओ दाखविण्यात येत आहे. त्यामुळे या 15 सेकंदाच्या व्हिडिओचा अर्धवट अर्थ गृहित धरुन ही पोस्ट व्हायरल होत आहे. आपण मुळ व्हिडिओतील 5.29 मिनिटांपासून ते 7.40 मिनिटांपर्यंत मणीशंकर अय्यर यांनी दिलेले उत्तर आपण पाहू शकता.

व्हायरल पोस्ट मधील व्हिडिओबद्दल नेमके सत्य काय?

 • काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांचा मुळ व्हिडिओ हा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची राजकीय कारकीर्द आणि राजकीय व्हिजन या विषयीचा आहे.
 • या व्हिडिओमध्ये 1991 ला मध्यवर्ती निवडणूकांसाठी जेव्हा प्रचार सुरू होता त्यादरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली. यावेळी मणीशंकर अय्यर यांनी स्पष्टपणे असे सांगितले आहे की, राजीव गांधी यांची हत्या होण्यापुर्वी आणि हत्या झाल्यानंतरही काँग्रेस पक्षाला संपुर्ण बहुमताचे सरकार स्थापन करणे कठिण होते. कारण त्यांच्या हत्येनंतरही काँग्रेस पक्षाला संपुर्ण बहुमताचा आकडा गाठता आला नाही.
 • सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये केवळ 15 सेकंदाचा इंग्रजी वक्तव्याचा भाग एडिट करुन दाखवत असून, मुळ व्हिडिओत राजीव गांधी यांच्याविषयी असे म्हटलेले नाही. त्यामुळे केवळ 15 सेकंदाच्या वक्तव्याचा गृहित अर्थ ठरवून चुकीच्या संदर्भाने पसरविण्यात येत आहे.

याशिवाय 1991 या वर्षीचे मध्यवर्ती निवडणूका नंतर काँग्रेस पक्षाला एकूण किती जागा मिळाल्या हे आपण खाली वाचू शकता.

Economic and Political WEEKLY l अर्काईव्ह

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणारा काँग्रेस नेते मणी शंकर अय्यर यांचा 15 सेकंदाचा व्हिडिओ आहे. मुळ व्हिडिओमध्ये मणी शंकर अय्यर यांचे वक्तव्य मुळ 2 मिनिटांचे आहे. परंतू केवळ 15 सेकंदाचे वक्तव्य एडिट करुन लोकसभा 2019 च्या अनुषंगाने चुकीच्या पद्धतीने अर्धवट अर्थ गृहित करुन दाखविण्यात येत आहे. मणी शंकर अय्यर यांनी राजीव गांधींना मारलं नसतं तर काँग्रेसला तेव्हा सत्ता मिळाली नसती असे म्हटले आहे. पण त्यावाक्याच्या पुढे लगेचच त्यांच्या हत्येनंतरही काँग्रेसला सत्तेसाठी बहुमत गाठता येईल एवढा आकडा पार करता आला ऩव्हता असे म्हटले आहे. त्यामुळे व्हायरल पोस्टमधील व्हिडिओ हा चुकीच्या पद्धतीने पसरविण्यात येत आहे. त्यामुळे ही पोस्ट संमिश्र स्वरुपाची आहे.  

Avatar

Title:“राजीव गांधींना मारलं नसतं तर काँग्रेसला तेव्हा सत्ता मिळाली नसती” असं काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर म्हणाले का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: Mixture


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •