हल्ल्यानंतर जवानांचे सेलिब्रेशन म्हणून एका वर्षापूर्वीचा व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य

False राष्ट्रीय

भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळावर हवाई हल्ला केल्यानंतर देशभरात आनंदाची लाट पसरली आहेत. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडियो क्लिप व्हायरल होत आहे. त्यात दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी असे नृत्य करून आनंद साजरा केला. फॅक्ट क्रेसेंडो याची तथ्य पडताळणी केली.

फेसबुकवर पीसीबीटुडे या पेजवरून हा व्हिडियो 27 फेब्रुवारी दुपारी एक वाजता पोस्ट करण्यात आला. तो तुम्ही खाली पाहू शकता. पडताळणी करेपर्यंत हा व्हिडियो सुमारे 19 हजार वेळा पाहिला गेला होता.

पीसीबीटुडे फेसबुक अर्काइव्ह

माय मराठी फेसबुक पेजवरूनदेखील हा व्हिडियो शेयर करण्यात आला आहे. त्यासोबत कॅप्शन लिहिले आहे की, “दहशतवाद्यांवर हल्ला केल्यानंतर सकाळी 4:30 वाजता भारतीय जवान आनंद व्यक्त करताना.” पडताळणी करेपर्यंत हा व्हिडियो सुमारे 81 हजार वेळा पाहिला गेला.

माय मराठी फेसबुक अर्काइव्ह

यासह विविध यूजर्स आणि फेसबुक पेजेसवरूनदेखील हाच व्हिडियो पोस्ट करण्यात आला आहे.

तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रेसेंडोने यूट्यूबवर विविध कीवर्ड्सने सर्च केले. त्यामध्ये Indian army dance असे सर्च केले असता खालील व्हिडियो समोर आला.

हा व्हिडियो इंडियन आर्मी नावाच्या एका यूजरने 20 मार्च 2018 रोजी यूट्यूबवर अपलोड केला होता. त्यामुळे हा व्हिडियो एक वर्ष जूना आहे.

हा एक वर्ष जूना व्हिडियो 2 मिनिट 59 सेंकदाचा आहे. सोशल मीडियावरील व्हिडियो क्लिप ही या व्हिडियोतून घेतल्याचे पहिल्या 30 सेंकदावरून स्पष्ट होते.

निष्कर्ष – असत्य

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीतून हे सिद्ध होते की, सदरील व्हिडियो एक वर्ष जूना आहे. त्यामुळे पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी केलेल्या जल्लोषाचा हा व्हिडियो नाही. त्यामुळी हा दावा असत्य आहे.

Avatar

Title:हल्ल्यानंतर जवानांचे सेलिब्रेशन म्हणून एका वर्षापूर्वीचा व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False