हा फोटो बालाकोटवर हल्ला करणाऱ्या वैमानिकांचा नाही. शेयर करण्यापूर्वी हे वाचा

False राष्ट्रीय

भारतीय हवाई दलाने मंगळवारी (25 फेब्रुवारी) पहाटे पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर सोशल मीडियावर भारतीय वायूसेनेतील तीन वैमानिकांचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये दावा करण्यात येत आहेत की, हा फोटो बालाकोट मोहिमेतील वैमानिकांचा आहे. स्टार मराठी या फेसबुक पेजवरून हा फोटो 27 फेब्रुवारी सकाळी हा फोटो पोस्ट करण्यात आला. याची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली.

स्टार मराठी फेसबुक- अर्काइव्ह

पडताळणी करेपर्यंत हा फोटो 155 वेळा शेयर आणि त्यावर दोन हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळालेल्या आहेत.

तथ्या पडताळणी

स्टार मराठीने वरील फोटो अपलोड करून सोबत कॅप्शन लिहिली की, “हेच ते काल सकाळी पाकिस्तान आणि त्याचा आतंकवाद्यांचा माज जिरावणणारे भारतीय वायुसेनेचे शूरवीर जवान”

फॅक्ट क्रेसेंडो हा फोटे गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केले असता, खालील रिझल्ट समोर आले.

येथून मग विविध वेबसाईटवर तपासणी केली असता संबंधित फोटो विविध कारणांसाठी आणि बालाकोटवरील हल्ला होण्याच्या आधी वापरण्यात आला आहे. ते तुम्ही खाली पाहू शकता.

हा फोटो एसएसबी क्रॅक या संकेतस्थळावर 13 डिसेंबर 2014 रोजी अपलोड केला होता. संरक्षण दलामधील करिअरसंबंधीच्या लेखात हा फोटो केवळ प्रातिनिधिक स्वरूपात वापरला आहे. तो मूळ आर्टिकल येथे वाचा – एसएसबी क्रॅकअर्काइव्ह

येथून मग आम्ही डिफेन्स लव्हर या वेबसाईटवरील लिंकवर गेलो. तेथे संबंधित फोटो 27 जुलै 2017 रोजी अपलोड केल्याचे आढळले. येथेदेखील प्रातिनिधिक स्वरूपातच हा फोटो वापरला आहे. तो मूळ आर्टिकल तुम्ही येथे वाचू शकता – डिफेन्स लव्हरअर्काइव्ह

तसेच आम्ही हा फोटो टिनआय या संकेतस्थळावरदेखील रिव्हर्स इमेज सर्च केला. तेव्हा खालील रिझल्ट समोर आले.

हा फोटो झूम केल्यावर या वैमानिकांचा नावे दिसून येतात. फोटोमध्ये डावीकडून आहेत एम. गेरा, एम बी वालुंज आणि एस प्रशांत आहेत. हा फोटो हाय रेझ्यूलेशनमध्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

निष्कर्ष – असत्य

संबंधित फोटो अगदी 2014 पासून इंटरनेटवर उपलब्ध असून तो केवळ प्रातिनिधिक स्वरूपात वापरण्यात आला आहे. फोटोतील वैमानिकांचा आणि बालाकोट येथील हवाई हल्ल्याचा काही संबंध नाही. स्टार मराठीची ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:हा फोटो बालाकोटवर हल्ला करणाऱ्या वैमानिकांचा नाही. शेयर करण्यापूर्वी हे वाचा

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False