एकनाथ शिंदें कॅमेऱ्यासमोर आले म्हणून नरेंद्र मोदींनी त्यांना बाजूला केले का? पाहा या व्हिडिओचे सत्य

False राजकीय

पंतप्रधान मोदींनी नुकतेच नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. या सोहळ्यातील एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

या व्हायरल क्लिपमध्ये नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे यांना हाताला धरून मागे ढकलताना दिसतात. हा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, एकनाथ शिंदें कॅमेऱ्यासमोर आले म्हणून नरेंद्र मोदींनी त्यांना बाजूला केले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ अर्धवट असून संदर्भविना शेअर केल जात आहे.

काय आहे दावा?

दहा सेकंदाच्या या क्लिपमध्ये नरेंद्र मोदी रेल्वे फलाटावरून लोकांना अभिवादन करताना दिसतात. त्यांच्या बाजूला एकनाथ शिंदे उभे आहेत. पीएम मोदी शिंदेंच्या हाताला धरून त्यांना मागे सारताना दिसतात.

हा व्हिडिओ शेअर करून म्हटले जात आहे की, मोदींनी फोटोसाठी एकनाथ शिंदे यांचा अपमान केला. टोमणा मारताना युजर लिहितात की, ‘किती वेळा सांगितले माझ्या फोटोफ्रेममध्ये नको येऊ.’

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओचे बारकाईने निरीक्षण केल्यावर एबीपी माझा वाहिनीचा लोगो दिसतो. त्यानुसार, एबीपी माझा वाहिनीवरील मूळ व्हिडिओचा शोध घेतला. 

मोदींनी 11 डिसेंबर रोजी नागपूर येथील रेल्वेस्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला हिरावा झेंडा दाखवला होता. व्हायरल व्हिडिओ या सोहळ्यातील आहे. 

एबीपी माझा वाहिनीचा मूळ व्हिडिओ पाहिल्यावर कळतेत की, सदरील क्लिप अर्धवट आणि सोयीने कापलेली आहे. 

मूळ व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, नरेंद्र मोदी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवताना एकनाथ शिंदे त्यांच्य बाजुलाचा उभे होते. रेल्वे फलाटातून पूर्णपणे जाईपर्यंत ते तेथेच उभे होते. 

ट्रेन गेल्यावर मोदींनी शिंदेंच्या हाताला हात लावला आणि मग उजव्या हाताने हस्तोंदलन केले. दोघांमध्ये काहीतरी बोलणेदेखील होते. या क्षणाआधीच व्हिडिओ अर्धवट कापून शेअर केला जात आहे. 

मूळ व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, नरेंद्र मोदींनी एकनाथ शिंदे यांना कॅमेऱ्यासमोर आल्यामुळे बाजूला केले नाही. त्यांच्याशी हात मिळवण्यासाठी त्यांनी त्यांना धरले होते.

व्हायरल क्लिप आणि मूळ व्हिडिओ यांची तुलना केल्यावर हा फरक लगेच लक्षात येतो.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, मूळ व्हिडिओला सोयीने एडिट करून अर्धवट क्लिपद्वारे चुकीची माहिती पसरविली जोती आहे. एकनाथ शिंदे कॅमेऱ्यासमोर आले म्हणून नरेंद्र मोदींनी त्यांना बाजूला सारले ही चुकीची माहिती आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:एकनाथ शिंदें कॅमेऱ्यासमोर आले म्हणून नरेंद्र मोदींनी त्यांना बाजूला केले का? पाहा या व्हिडिओचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False