डेटॉल हा कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय आहे का? वाचा सत्य

Coronavirus False वैद्यकीय

चीनमध्ये कोरोना व्हायरसने आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही याचे संशयित रुग्ण आढळले आहेत. प्रशासनाकडून याबाबत खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. केरळमध्ये तिघांना याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच आता एका छायाचित्रासह डेटॉल हा कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय असल्याचा दावा करण्यात येत आहे. छायाचित्रासह डेटॉल हा कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Dettol.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

डेटॉल हा खरोखरच कोरोना व्हायरस रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही शोध घेतला असता आम्हाला डेली मेलवरील खालील वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार डेटॉल हा कोरोना व्हायरस रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय नसल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे. 

screenshot-www.dailymail.co.uk-2020.02.04-16_56_01.png

डेली मेलवरील सविस्तर वृत्त / Archive

याबाबत डेटॉलने वक्तव्य जारी करत वुहान कोरोना व्हायरसबाबत कोणतीही चाचणी घेतली नसल्याचे म्हटले आहे. सार्ससारख्या आजारात ते प्रभावी आढळले होते. वुहान कोरोना व्हायरसबाबत मात्र असे म्हणता येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. खलीज टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

screenshot-www.khaleejtimes.com-2020.02.04-17_34_05.png

खलीज टाईम्समधील सविस्तर वृत्त / Archive

डेटॉलने याबाबत त्यांच्या संकेतस्थळावरही स्पष्टीकरण दिले आहे. हे सविस्तर स्पष्टीकरण आपण येथे वाचू शकता. या स्पष्टीकरणातील काही भाग आम्ही खाली दिला आहे.

screenshot-www.dettolarabia.com-2020.02.04-17_53_30.png

डेटॉलने कोरोनो व्हायरसबद्दल दिलेले स्पष्टीकरण / Archive

यातून हे स्पष्ट होते की, सध्या सुरु असणाऱ्या कोरोना व्हायरससाठी डेटॉल हा प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे चाचण्यांद्वारे अजुन सिध्द झालेले नाही.

निष्कर्ष 

डेटॉल हे सध्या सुरु असणाऱ्या कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे चाचण्याद्वारे अजुन सिध्द झालेले नाही. त्यामुळे याबाबत पसरविण्यात येत असलेली माहिती असत्य आहे.

Avatar

Title:डेटॉल हा कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False