चंद्रावर अशोकस्तंभचा ठसा असलेला तो व्हायरल फोटो खरा नाही; वाचा सत्य
चंद्रयान-3 चंद्रावर उतरल्यावर प्रज्ञान रोव्हर तेथे फिरून वैज्ञानिक शोध व माहिती गोळा करणार आहे. दरम्यान, असे बोलले जात आहे की, या रोव्हरच्या चाकावर भारतीय राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभाची डिझाईन करण्यात आली आहे.
सध्या सोशल मीडियावर चंद्रावर अशोकस्तंभाचे ठसे दिसणारा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा फोटो चंद्रावरील प्रज्ञान रोव्हरद्वारे उमटलेल्या ठशांचा आहे.
पडताळणीअंती कळाले की, हा फोटो बनावट आहे. चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये इस्त्रोचा लोगो आणि अशोकस्तंभाच्या चिन्हांसोबत चाकाचे ठसे दिसतात.
हा फोटो शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “चंद्रयान 3 चे प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भ्रमण करत असताना, त्याची चाके चंद्राच्या पृष्ठभागावर इस्रोच्या लोगोचे आणि भारताच्या राष्ट्रीय चिन्हा अशोकस्तंभ चे ठसे (चिन्ह) बनवणार आहे.”
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
हा फोटो जर खरा असेल तर तो इस्रोद्वारे अधिकृतरीत्या जारी करण्यात येईल. परंतु, इस्रोच्या सोशल मीडिया अकाउंटवर असा कोणताही फोटो आढळला नाही.
व्हायरल फोटोमध्ये Krishanshu Garg नाव लिहिलेले दिसते.
कृशांशु गर्ग नामाक व्यक्तीने ट्विटर 23 ऑगस्ट रोजी हा फोटो शेअर केल्याचे आढळले.
फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “[हे पाहण्याची] उत्सुकता लागली आहे.”
चंद्रयान-3 चंद्रावर उतरल्यानंतर अनेकांनी हा फोटो खरा मानून शेअर करण्यास सुरूवात केली. मग कृशांशु गर्गने इंस्टाग्रामवर या दाव्याचे खंडन करत सांगितले की, “व्हायरल होत असलेला फोटो मी डिझाइन केले असून ते “वास्तविक ठसे” नाहीत. कृपया या संदर्भात फेक बातम्या पसरविने थांबवा.”
मूळ पोस्ट – इंस्टाग्राम
प्रज्ञान रोव्हर
इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवर एक व्हिडिओ उपलब्ध आहे. ज्यामध्ये काही शास्त्रज्ञ ‘प्रज्ञान रोव्हर’ला ‘विक्रम लँडर’मध्ये बसवताना दिसतात.
खालील स्क्रीनशॉटमध्ये प्रज्ञान रोव्हरच्या एका चाकावर आपण इस्रोचे लोगो पाहू शकतात.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी प्रज्ञान रोव्हरचे फोटो ट्विट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, प्रज्ञानाच्या चाकावर, इस्रोचे लोगो आणि अशोक चक्र आहे.हे रोव्हर चंद्रावर आपली छाप सोडेल हे स्पष्ट आहे.
सध्या ‘प्रज्ञान’ रोव्हर ‘विक्रम’वरून बाहेर पडले असून, त्याने दक्षिण ध्रुवावरील चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास सुरु केला आहे. लँडर आणि रोव्हरवरील सर्व यंत्रणा सुरळीत सुरु असल्याचे इस्रोने जाहीर केले आहे.
तसेच इस्रोने प्रज्ञान रोव्हरचा विक्रम लँडरवरून बाहेर पडतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
अर्थात इस्रोने प्रज्ञान रोव्हर चंद्रावर अशोकसंभ आणि इस्त्रोचे ठसे पडलेला फोटो अद्याप शेअर केला नाही.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला फोटो वास्तविक ठशांचा नाही. ते केवळ सृजनशील कलाकृती आहे. चुकीच्या दाव्यासह कॉम्प्युटर ग्राफिक्सद्वारे तयार केलेला फोटो व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:चंद्रावर अशोकस्तंभचा ठसा असलेला तो व्हायरल फोटो खरा नाही; वाचा सत्य
Written By: Sagar Rawate
Result: False