तोडफोड करणारा हा नग्न व्यक्ती कोरोना रुग्ण नाही. तो पाकिस्तानातील जूना व्हिडियो आहे. वाचा सत्य

Coronavirus False
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

कोरोना विषाणूचा ईलाज करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसवर हल्ला होत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडियो पसरविला जात आहे. यामध्ये एक नग्न व्यक्ती कथितरीत्या दवाखान्यात तोडफोड करत आहे. हा व्यक्ती तबलिगी जमातीतील असून, तो उत्तरप्रदेशामध्ये एका रुग्णालयात अशा प्रकारे वर्तन करीत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअप हेल्पलाईनवर या व्हिडियोचे सत्य काय आहे हे तपासण्याची वाचकांनी विनंती केली आहे. आमच्या पडताळणीत हा व्हिडियो पाकिस्तानातील असल्याचे स्पष्ट झाले.

काय आहे व्हिडियोमध्ये?

सुमारे अडीच मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये एक नग्न व्यक्ती डोक्यानेच खिडक्या आणि दरवाजांच्या काचा फोडताना दिसतो. काच लागून रक्तबंबाळ झालेल्या या व्यक्तीला मग एक जण दंडुक्याचा धाक दाखवून शांत करतो. हा व्हिडियो उत्तरप्रदेशमधील एका रुग्णालयातील असल्याचा म्हणून पसरविला जात आहे. 

दिल्लीमधील निजामुद्दीन मर्कझ येथील धार्मिक सोहळ्यातील तबलिगी जमातीशी याचा संबंध जोडला जात आहे.

WhatsApp Image 2020-04-17 at 5.12.19 PM.jpeg

अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियोची सत्यता जाणून घेण्यासाठी इनव्हिड टूलच्या माध्यमातून की-फ्रेम्सची निवड केली. मग यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केले असता 4 नोव्हेंबर 2019 रोजी Stranakrovi नावाच्या वेबसाईटवर हा व्हिडियो अपलोड केल्याचे आढळले. Naked fool in the hospital असे त्याला शीर्षक दिले आहे.

त्याचबरोबर गुगल रिव्हर्स इमेज सर्चमध्ये पाकिस्तानातील फेसबुक पेजवरून 20 ऑक्टोबर 2019 रोजी हाच व्हिडियो शेयर केल्याचे दिसते. परंतु. या व्हिडियोचे नेमके स्थान व निमित्त यामध्ये दिलेले नाही. 

पण हे तर निश्चित होते की, हा व्हिडियो कोरोना व्हायरसची साथ पसरण्यापूर्वीपासून उपलब्ध आहे.

2020-04-08.png

वरील धागा पकडून कीवर्ड्सच्या माध्यमातून शोधले असता, 28 ऑक्टोबर 2019 रोजी Voice of Heart नावाच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडियो पाकिस्तानातील कराची शहरातील असल्याचे म्हटले आहे. या व्यक्तीने कराचीतील एका मशीदीमध्ये असा धुमाकुळ घातला होता, अशी माहिती या व्हिडियोमध्ये देण्यात आली आहे.

हा धागा पकडून मग आणखी शोध घेतला असता पाकिस्तान टुडे वेबटीव्ही नावाच्या फेसबुक पेजवरून 24 ऑगस्ट 2019 रोजी हा व्हिडियो शेयर केल्याचे सापडले. उर्दू भाषेतून दिलेल्या कॅप्शननुसार, एक अनोळखी व्यक्ती पूर्णतः नग्न होऊन कराचीमधील खालीद बिन वालिद मशीदीमध्ये घुसला होता. त्याने मशीदीमध्ये तोडफोड केली होती. स्टील टाऊन पोलिसांनी मग या व्यक्तीला ताब्यात घेतले. या व्यक्तीचे नाव शफीक अब्रु असल्याचे तपासात निष्पण्ण झाले होते. तो मानसिकदृष्ट्या कमजोर असून यापूर्वीदेखील त्याने नग्नावस्थेत आसपासच्या घरे-दुकानांमध्ये धुमाकुळ घातलेला होता.

मूळ पोस्ट येथे पाहा – पाकिस्तान टुडे वेबटीव्ही

निष्कर्ष

यावरून हे स्पष्ट होते की, एक तर हा व्हिडियो जूना आहे. त्याचा कोरोनाशी काही संबंध नाही. तसेच हा व्हिडियो उत्तर प्रदेशच किंवा भारतातील नाही. ही पाकिस्तानमधील घटना आहे. सदरील व्हिडियोला चुकीच्या दाव्यासह शेयर केले जात आहे.

Avatar

Title:तोडफोड करणारा हा नग्न व्यक्ती कोरोना रुग्ण नाही. तो पाकिस्तानातील जूना व्हिडियो आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •