सुशील कुमार शिंदे सोलापूरात भाजपला मतदान करायला सांगत आहेत का? : सत्य पडताळणी

False राजकीय

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सोलापूरमधील कॉंग्रेस पक्षाचे लोकसभा 2019 साठीचे उमेदवार सुशील कुमार शिंदे हे सोलापूरात भाजपला मतदान करण्याचं आवाहन करतायेत अशा आशयाची हेडलाइन असणारी पोस्ट व्हायरल झाली आहे. फॅक्ट क्रिसेंडो कडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट फेसबुकवर सचिन कुलकर्णी या व्यक्तीच्या अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

ही पोस्ट फेसबुकवर इतर अनेक पेज आणि अकाउंटवर व्हायरल झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये सोलापूर लोकसभा 2019 कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनी भाजपला मतदान करण्याचं आवाहन केल्याचं वंचित आवाज या वेबसाईटवर असलेल्या आर्टीकलमध्ये हेडलाइन देण्यात आले आहे. या आर्टिकलमध्ये सोलापूरमध्ये ज्या ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा 2019 साठी उमेदवार बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांना समर्थन असणाऱ्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले आहे, असे म्हटले आहे.  

वंचित आवाजअर्काईव्ह

या संदर्भात सत्य जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने गुगलवर सोलापूर सुशील कुमार शिंदे उमेदवारी न्यूज असे सर्च केले.

त्यानंतर सुशील कुमार शिंदे यांनी आपल्याला आणि मुलगी प्रणिती शिंदे यांनाही भाजपकडून ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला असल्याच्या बातम्या विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत.

महाराष्ट्र टाईम्सअर्काईव्ह

लोकसत्ताअर्काईव्ह

लेस्टलीअर्काईव्ह

सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी कधीही कॉंग्रेस पक्ष सोडून जाण्याचा विचार केलेला नाही. या संदर्भात युट्युबवर एबीपी माझा या चॅनलवर 26 मार्च 2019 रोजी व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.

अर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये सोलापूर लोकसभा 2019 कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार सुशील कुमार शिंदे हे सोलापूरला मतदान होण्याच्या केवळ एक दिवस आधी भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत या आशयाची पोस्ट व्हायरल झाली आहे. दरम्यान या पोस्टमध्ये सोलापूर बहुजन वंचित आघाडीचे लोकसभा 2019 उमेदवार बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांना सोलापूरात ज्या ज्या ठिकाणी समर्थन मिळत आहेत त्या ठिकाणावरच सुशील कुमार शिंदे यांनी लक्ष देण्याचे काम सुरु केले आहे असे म्हटले आहे. दरम्यान सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे आणि बाळासाहेब आंबेडकर यांची अचानक बालाजी हॉटेलमध्ये भेट झाल्याची बातमी 12 एप्रिलला प्रसिद्ध झालेली आहे. एबीपी माझा या युट्युब चॅनलवर 12 एप्रिल 2019 रोजी या विषयीचा व्हिडिओ आपलोड झाला आहे.

अर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टसंदर्भात फॅक्ट क्रिसेंडो टीमने कॉंग्रेसच्या फेसबुकवरील ऑफिशिअल पेजवरुन माहिती घेतली. तसेच सोलापूर येथील कॉंग्रेस कार्यालयाशी संपर्क केला.

सुशील कुमार शिंदे यांनी कधीही लोकांना भाजपसाठी मतदान करावे असे आवाहन केलेले नाही. याउलट उद्या (18 एप्रिल 2019) मतदान आहे. या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी ते तयारीत आहे. ते नेहमी कॉंग्रेसलाच मत द्या असे म्हणत आले आहेत. त्यांच्या विरोधात विरोधकांनी पसरविलेली ही एक अफवा आहे, अशी माहिती प्रेमा चिंचुळकर यांनी फॅक्ट क्रिसेंडोला फोनवरुन दिली.

प्रेमा चिंचुऴकर,
कॉंग्रेस शहराध्यक्ष, सोलापूर  

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये सुशील कुमार शिंदे सोलापूरात भाजपला मतदान करायला सांगत आहेत असा दावा करण्यात आलेला आहे. परंतू संशोधनाअंती व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील दावा हा खोटा आहे.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये सोलापूर निवडणूक मतदानाच्या बरोबर एक दिवस आधी सोलापूर लोकसभा 2019 कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार सुशील कुमार शिंदे सोलापूरात भाजपला मतदान करायला सांगत आहे असे म्हटलेले आहे. संशोधनानंतर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमधील तथ्य खोटे आहे.

Avatar

Title:सुशील कुमार शिंदे सोलापूरात भाजपला मतदान करायला सांगत आहेत का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False