मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या का? : सत्य पडताळणी

Mixture राजकीय

(संग्रहित छायाचित्र)

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट मराठा क्रांती मोर्चाची एकही मागणी मान्य न करता मराठा समाजाची फसवणूक महाराष्ट्रातील भाजप – महायुतीने केली आहे, अशी पोस्ट व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने या पोस्टची सत्य पडताळणी करेपर्यंत या पोस्टला फेसबुकवर जागर शिवधर्माचा 518 लाईक्स, 321 शेअर आणि 60 कमेंटस् मिळाल्या आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर फेसबुकवर इतर अकाउंट आणि फेसबुकपेजवर ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

मराठा क्रांती मोर्चा, मराठा आरक्षण आणि शासन निर्णय हे जाणून घेण्यासाठी आम्ही गुगलवर महाराष्ट्र शासन मराठा आरक्षण असे सर्च केले.

व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, भाजप – शिवसेना युतीने मराठा क्रांती मोर्चाची एकही मागणी मान्य केली नाही. यासंदर्भात विविध वृत्तपत्र, वेबसाईटवर बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. खाली दिलेल्या लिंकमध्ये आपण सविस्तर बातमी वाचू शकता.

मराठा क्रांती मोर्चा सुरुवात आणि शेवट या विषयावर वेब दुनिया या वेबसाईटवर माहिती प्रसिद्ध झाली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या आणि शासन निर्णय याविषयी माहिती दिली आहे.

वेब दुनियाअर्काईव्ह

एबीपी न्यूजअर्काईव्ह

भाजप – शिवसेना सरकारने मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षण कायदा लागू करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या काही मागण्या मान्य झाल्याचे संशोधनाअंती समोर आले आहे. उदाहरणादाखल फॅक्ट क्रिसेंडोने मराठा क्रांती मोर्चाच्या तीन मागण्या घेऊन सत्य संशोधन केले.

मराठा क्रांती मोर्चा मागण्या …

  • मराठा आरक्षण
  • कोपर्डी प्रकरणातील आरोपींना शिक्षा
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक

महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा आरक्षण मागणी मान्य केली का?

महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर मराठा आरक्षणाबाबत 01 डिसेंबर 2018 रोजी घेण्यात आलेला एक निर्णय देण्यात आलेला आहे. विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर या विषयावर बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. खाली दिलेल्या वेबसाईटवर आपण सविस्तर निर्णय वाचू शकता.

महाराष्ट्र शासनअर्काईव्ह

युट्युबवर 19 डिसेंबर 2018 रोजी कॉम्पेटेट्विव एक्झाम हब या चॅनलवर सविस्तर माहितीचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

अर्काईव्ह

दैनिक लोकसत्ताअर्काइव्ह

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तातडीने शिक्षा ही मागणी मान्य झाली का?

कोपर्डी प्रकरणात 15 वर्षीय शालेय मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला होता. या संदर्भातील आरोपींना शिक्षा झाली आहे. या खटल्याचा निकाल विशेष न्यायालयाकडून (फास्ट ट्रॅक कोर्टात) देण्यात आला.

दैनिक लोकसत्ताअर्काईव्ह

द हिंदूअर्काईव्ह

कोपर्डी हत्या प्रकरण संदर्भात तीनही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 ला शिक्षा देण्यात आली आहे. याविषयावर युटयुबवर एएनआय न्युज या चॅनेलवर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याचे सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांना न्यायालयाचा निर्णय, प्रतिक्रिया दिल्याचा व्हिडिओ 29 नोव्हेंबर 2017 रोजी अपलोड करण्यात आला आहे.

अर्काईव्ह

कोपर्डी प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असल्याचे दैनिक पुढारीचे गुन्हेगारी विषयक वार्तांकन करणारे पत्रकार गणेश शेंडगे यांनी फॅक्ट क्रिसेंडोला सांगितले.  

छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणी काम सुरु झाले का?

या संदर्भात महाराष्ट्र शासनाने काम सुरु केले असून, या विषयावर अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जलपूजनाचे काम झाले आहे. या विषयावर विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.

बिझनेस टुडेअर्काईव्ह

आऱटीआय वर्डप्रेसअर्काईव्ह

या विषयावर युट्युबवर एबीपी न्यूज या चॅनलवर 24 डिसेंबर 2016 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी अरबी समुद्रात जावून जलपुजन केल्याचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

एबीपी न्यूजअर्काईव्ह

सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्चाची एकही मागणी मान्य न करता मराठा समाजाची फसवणूक महाराष्ट्रातील भाजप – महायुतीने केली आहे, अशी पोस्ट व्हायरल होत आहे. परंतू महाराष्ट्र शासन भाजप – युती सरकारने मराठा क्रांती मोर्चाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. याविषयी विविध वृत्तपत्र आणि वृत्तसंस्थांमध्ये बातमी प्रसिद्ध झालेली आहे.

महाराष्ट्र टाईम्सअर्काईव्ह

एबीपी न्यूजअर्काईव्ह

मराठा क्रांती मोर्चा मागण्या या विषयावर औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया फॅक्ट क्रिसेंडो टीमने घेतल्या.

  • मराठा क्रांती मोर्चाच्या काही मागण्या महाराष्ट्र शासनाने मान्य केल्या आहेत. मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना ताबडतोब शिक्षा किंवा इतर मागण्या यापैकी काही मागण्या महाराष्ट्र शासनाने मान्य केल्या आहेत. परंतू मराठा आरक्षण हे न्यायप्रविष्ठ आहे, शेतकरी कर्जमाफी झाली आहे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक यासंदर्भात जलपुजन झाले आहे परंतू प्रत्यक्ष कामाला गती आलेली नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या काही मागण्या महाराष्ट्र शासनाने मान्य केल्या आहेत, पण काही मागण्या अजूनही न्यायप्रविष्ठ आहेत.

अभिजीत देशमुख,
मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवक, औरंगाबाद  

  • मराठा क्रांती मोर्चाच्या काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ आहे. शेतकरी कर्जमाफी जरी झाली असली तरी इतर अनेक मागण्या या न्यायप्रविष्ठ आहे.

विनोद पाटील,
मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवक, औरंगाबाद.

निष्कर्ष :  मराठा क्रांती मोर्चाची एकही मागणी मान्य न करता मराठा समाजाची फसवणूक महाराष्ट्रातील भाजप – महायुतीने केली आहे, अशी पोस्ट व्हायरल होत आहे. परंतू महाराष्ट्र शासन भाजप – युती सरकारने मराठा क्रांती मोर्चाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. यातील काही बाबी या न्यायप्रविष्ठ आहेत. काही बाबी न्यायप्रविष्ठ असल्याने फॅक्ट क्रिसेंडोच्या तथ्य पडताळणीत  ही पोस्ट संमिश्र आहे.

Avatar

Title:मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: Mixture