FACT CHECK: अमेरिकेत बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली का? वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय

अमेरिकेमध्ये बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली, असा दावा करीत एक व्हिडियो शेयर केला जात आहे. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चित्राचे अनावरण करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून याची सत्य पडताळणी करण्याची विनंती केली.

हा व्हिडियो खाली पाहू शकता. 

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

इंटरनेटवर या व्हिडियोबाबत शोध घेतला असता कळाले की, मूळ व्हिडियो ओबामांच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमाचा आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या पत्नीचे तैलचित्र काढण्याची अमेरिकेत प्रथा आहे. सीएनएनच्या बातमीनुसार, 2018 साली बराक व मिशेल ओबामा यांच्या चित्रांचे अनावरण करण्यात आले होते. स्मिथसोनियन्स नॅशनल पोर्ट्रेन गॅलरी येथे हे चित्र ठेवण्यात आलेले आहे.

बीबीसीच्या युट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचा व्हिडियो पाहू शकता. यामध्ये स्पष्ट दिसते की, ओबामा यांनी त्यांच्याच चित्राचे अनावरण केलेले आहे. हा भागा तुम्ही 55 व्या सेकंदापासून पाहू शकता. दोन्हींची तुलना खाली दिलेली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, मूळ व्हिडियोला एडिट करून ओबामा यांच्या चित्राच्या जागी बिरसा मुंडा यांचे छायाचित्र टाकण्यात आले आहे.

निष्कर्ष

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमातील व्हिडियोला एडिट करून त्यात बिरसा मुंडा यांचे छायाचित्र लावण्यात आले. त्यामुळे सदरील पोस्ट आणि व्हिडियो असत्य आहे. तुमच्याकडेदेखील या संबंधी काही संशयास्पद माहिती असल्यास पडताळणीसाठी आम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवा.

Avatar

Title:FACT CHECK: अमेरिकेत बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False