रॉकेट घेऊन जाणाऱ्या ट्रकला पूराच्या पाण्यातून रस्ता ओलांडण्यासाठीचे नवे तंत्रज्ञान दाखवणारी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यासोबत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ भारतीय लष्कराने विकसित केलेल्या नवीन शस्त्रवाहतूक तंत्रज्ञानाचा आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणअंती कळाले की, व्हायरल क्लिप एका व्हिडिओ गेमची आहे.

काय आहे दावा ?

या पाच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये रॉकेट लादलेला एक ट्रक लाकडी पुलाद्वारे पूराने क्षतिग्रस्त झालेला रस्ता ओलांडतो. पुढे चालक नागमोडी रस्त्यावरून मोठ्या कौशल्याने ट्रक वळवतो.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “INDIAN ARMY ADVANCES आर्मी ट्रक चालवण्याची ही पद्धत तुम्ही आपल्या आयुष्यात कधीही बघितली नसेल ती पण कोणाच्याही मदतीशिवाय.”

मूळ पोस्ट - फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की, ही क्लिप एका व्हिडिओ गेममधून घेतलेली आहे.

जिम नेटेलो नावाच्या गेमरने 22 मार्च 2023 रोजी हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर अपलोड  केला होता. सोबतच्या माहितीनुसार, या गेमचे नाव ‘स्पिनटायर्स मडरनर’ (Spintires MudRunner) आहे. 

आर्काइव्ह

या गेमच्या अधिकृत वेबसाईट आणि फेसबुक पेजला भेट दिल्यावर कळाले की, ‘स्पिनटायर्स मडरनर’ गेममध्ये नागमोडी आणि अडथळ्यांनी भरलेले रस्त्यांवरून वाहन चालविण्याचे आव्हान दिलेले असते.

खालील व्हिडिओमध्ये आपण व्हायरल क्लिप सारखा गेमप्ले पाहू शकतात. 

https://youtu.be/7nql3j-74ig

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेली क्लिप मूळात एक व्हिडिओ गेम आहे. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ भारतीय लष्काराशी जोडला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:व्हिडिओ गेमची क्लिप भारतीय लष्कराचे आधुनिक वाहतूक तंत्रज्ञान म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: False