अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजन समारंभाच्या मंडप सजावटीचा म्हणून व्हायरल होणारा व्हिडिओ हैदराबादमधील मंदिराचा; वाचा सत्य

False सामाजिक

अयोध्या येथे राम मंदिराचा भूमीपूजन समारंभ 5 ऑगस्ट 2020 रोजी होणार आहे. तत्पूर्वी समाजमाध्यमात अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजन समारंभाच्या मंडप सजावटीचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजन समारंभाच्या मंडप सजावटीचाच आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक / संग्रहित

तथ्य पडताळणी

राम मंदिराच्या भूमीपूजन समारंभाच्या मंडप सजावटीचा हा व्हिडिओ आहे का, हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला. तेव्हा ईटीव्ही तेलंगणाने 6 जानेवारी 2020 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात म्हटले आहे की, हैदराबाद येथील श्री रंगनाथस्वामी मंदिरात वैकुठ एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी झाली होती. या व्हिडिओतील अनेक द्दश्ये ही या सजावटीशी मिळतीजुळती असल्याचे दिसून येते.

संग्रहित

त्यानंतर आणखी शोध घेतल्यावर तेलंगणा टुरिस्ट बद्री या युटूयूब चॅनलवर 6 जानेवारी 2020 रोजी अपलोड करण्यात आलेला खालील व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओखाली देखील ही हैदराबादमधील जियागुडा येथील श्री रंगनाथस्वामी मंदिराची उत्तरद्वार दर्शनाची द्दश्ये असल्याचे म्हटले आहे. 

संग्रहित

त्यानंतर आणखी एका व्हिडिओतही अशाच स्वरूपाची द्दश्ये दिसून आली. वैकुठ एकादशीनिमित्त श्री रंगनाथस्वामी मंदिरात स्वामी मंदिरात करण्यात आलेल्या सजावटीचा हा व्हिडिओ असल्याचे याठिकाणी स्पष्ट म्हटले आहे.

संग्रहित

समाजमाध्यमात अयोध्या येथील राम मंदिराच्या भूमीपुजन सभारंभाच्या मंडपाचा म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि हैदराबाद येथील श्री रंगनाथस्वामी मंदिरातील व्हिडिओतील द्दश्याची तुलना खाली करण्यात आली आहे. यातून ही द्दश्ये  श्री रंगनाथस्वामी मंदिरातील असल्याचे स्पष्ट होत आहे. 

Compare image.png

निष्कर्ष

अयोध्या येथील राम मंदिराच्या भूमीपुजन समारंभाच्या मंडप सजावटीचा हा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य आहे. तो हैदराबाद येथील श्री रंगनाथस्वामी मंदिरातील वैकुठ एकादशीच्यावेळी करण्यात आलेल्या सजावटीचा आहे.  

Avatar

Title:अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजन समारंभाच्या मंडप सजावटीचा म्हणून व्हायरल होणारा व्हिडिओ हैदराबादमधील मंदिराचा; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False