Fact Check : हा व्हिडिओ कोल्हापूरात आलेल्या महापुराचा आहे का?

False आंतरराष्ट्रीय सामाजिक

मोदी सरकार कुठे आहे वाहुन गेले का कोल्हापूरच्या पुरात… असा एक व्हिडिओ
Kunal Kamble यांनी 9 ऑगस्ट 2019 रोजी फेसबुकवर शेअर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओचे बारकाईने निरीक्षण केले. त्यावेळी या व्हिडिओत आम्हाला काही जहाजेही दिसून आली. त्यामुळे या व्हिडिओतील काही छायाचित्रे घेऊन ती रिव्हर्स इमेज सर्च केली. त्यावेळी आम्हाला दैनिक लोकसत्ताच्या संकेतस्थळावर हा व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओच्या शीर्षकात कोल्हापूर: पावसामुळे मुक्या जनावरांचेही हाल असे म्हटले आहे.

दैनिक लोकसत्ता / Archive 

त्यानंतर आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. त्यावेळी आम्हाला पाकिस्तानमधील एक्स्प्रेस या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरील 30 जुलै 2019 रोजी दिलेले खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात हा व्हिडिओतील एक छायाचित्र दिलेले आहे. आपण हे वृत्त खाली पाहू शकता. 

Archive

या वृत्तात कराची बाजारात पाणी शिरल्याने व्यापारी अडचणीत आल्याचे म्हटले आहे. पशुपालन व्यवस्थापनाच्या निकृष्ट धोरणाचा फटका व्यापाऱ्यांना बसल्याचे यात म्हटले आहे. पावसाच्या पाण्याने ही स्थिती उद्भभवल्याचे म्हटले आहे. फेल्अर उर्दु या संकेतस्थळानेही या फोटोसह हे वृत्त दिले आहे. अपनी वेब डॉट कॉम या संकेतस्थळानेही हे वृत्त दिलेले आहे. 

कोल्हापूरमधील म्हणून प्रसारित होणाऱ्या व्हिडिओतील एक दृश्य आणि पाकिस्तान वृत्तपत्रात 30 जुलै 2019 रोजी प्रसिध्द झालेल्या छायाचित्राची आम्ही खाली तुलना केली आहे.

यातून हे स्पष्ट होत आहे की, हा व्हिडिओ कोल्हापूराच्या महापूराचा नसून कराचीतील जनावरांच्या बाजारात शिरलेल्या पाण्याचा आहे.

निष्कर्ष  

हा व्हिडिओ कोल्हापूराच्या महापूराचा नसून कराचीतील जनावरांच्या बाजारात शिरलेल्या पाण्याचा आहे. याबाबत पाकिस्तानमधील माध्यमांनी वृत्तही दिलेले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : हा व्हिडिओ कोल्हापूरात आलेल्या महापुराचा आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False