सरडा रंग बदलत असतानाची ही द्दश्ये कर्नाटकातील व्हिडिओग्राफरने टिपलेली नाहीत; वाचा सत्य

False राष्ट्रीय सामाजिक
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

सरडा रंग बदलत असतानाचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील द्दश्ये कर्नाटकातील बंगळुरू येथील व्हिडिओग्राफर विक्रम पोनप्पा यांनी टिपली असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही द्दश्ये विक्रम पोनप्पा यांनी टिपली आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

या व्हिडिओविषयी जाणून घेण्यासाठी विक्रम पोनप्पा यांच्या इन्स्टाग्राम खात्यास भेट दिली. त्यावेळी त्याठिकाणी असा कोणताही व्हिडिओ दिसून आला नाही. त्यानंतर वेगवेगळे शब्दप्रयोग करत आणि रिव्हर्स इमेजच्या सहाय्याने शोध घेतला. त्यावेळी लेस्टली या संकेतस्थळावर एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार हा व्हिडिओ जुना असून पूर्व आफ्रिकेतील मादागास्कर येथील आहे. 

screenshot-gujarati.factcrescendo.com-2020.09.28-23_38_16.png

लेस्टली / संग्रहित

हा व्हिडिओ द अ‍ॅनिमल बॉक्स ऑफिस या यूट्यूब चॅनेलवर 30 जानेवारी 2016 रोजी अपलोड करण्यात आला असल्याचे दिसून आले. 

संग्रहित

व्हिडिओग्राफर विक्रम पोनप्पा यांनी या व्हिडिओचे चित्रीकरण केले आहे का, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी चित्रीकरण केल्याचा दावा असत्य आहे. मी अशा प्रकारचे चित्रीकरण कधीही केलेले नाही. या स्वरूपाचे चित्रीकरण केल्याचा दावाही मी कधी केलेला नाही. 

निष्कर्ष 

पूर्व आफ्रिकेतील या व्हिडिओचे चित्रीकरण व्हिडिओग्राफर विक्रम पोनप्पा यांनी केल्याचा दावा असत्य आहे. 

Avatar

Title:सरडा रंग बदलत असतानाची ही द्दश्ये कर्नाटकातील व्हिडिओग्राफरने टिपलेली नाहीत; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •