पाकिस्तानच्या असफल क्षेपणास्त्र चाचणीचा हा व्हिडिओ आहे का, वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानने 23 जानेवारी 2020 रोजी गजनवी या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. त्यानंतर समाजमाध्यमात पाकिस्तानची ही क्षेपणास्त्र चाचणी अयशस्वी झाल्याचा दावा करत एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे क्षेपणास्त्र 300 किकलोमीटर जाण्याऐवजी अवघ्या 36 किलोमीटरवर जाऊन कोसळले, असा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. संजय शिंदे, पंकज सोनवणे आणि दीपक बर्दापूरकर आदींनी हा व्हिडिओ अशा माहितीसह पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ खरोखरच पाकिस्तानने केलेल्या असफल क्षेपणास्त्र चाचणीचा आहे का, याची तथ्य पडताऴणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

पाकिस्तानने 23 जानेवारी 2020 रोजी घेतलेल्या गजनवी या क्षेपणास्त्राच्या चाचणीचा हा व्हिडिओ आहे का, हे जाणून घेण्यासाठी हे आम्ही युटूयूबवर हा व्हिडिओ शोधला. त्यावेळी द टेलिग्राफ आणि युरो न्यूजने एक जुलै 2013 रोजी युटुयुबने अपलोड केलेले व्हिडिओ दिसून आले. यातील माहितीनुसार रशियाने कझाकिस्तान येथून ‘प्रोटोन एम रॉकेट’ 3 नेविगेशन उपग्रह प्रक्षेपित केला होता. काही वेळातच ते कोसळले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे रशियन अंतराळ संशोधन संस्थेने सांगितले.

Archive

याशिवाय नासाच्या स्पेसफ्लाईट संकेतस्थळावर आम्हाला एक जुलै 2013 रोजी प्रकाशित झालेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात या अयशस्वी प्रक्षेपणाविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

image2.jpg

नासाच्या स्पेसफ्लाईट संकेतस्थळावरील माहिती / Archive 

त्यानंतर आम्ही पाकिस्तानच्या संरक्षण विभागाच्या ISPR Official या युटूयूब चॅनलला भेट दिली. याठिकाणी आम्हाला गजनवी क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाचा व्हिडिओ दिसून आला. 

Archive

याशिवाय आम्हाला द इकोनॉमिक्स टाईम्स आणि द न्यूज यांनी दिलेले वृत्त दिसून आले. या वृत्तातही पाकिस्तानने गजनवी क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केल्याचे म्हटले आहे. 

image3.jpg

द इकोनॉमिक्स टाईम्स अक्राईव्ह / द न्यूज अक्राईव्ह

निष्कर्ष

पाकिस्तानच्या गजनवी क्षेपणास्त्राच्या अयशस्वी चाचणीचा हा व्हिडिओ नाही. पाकिस्तानने गजनवी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हा रशियाने कझाकिस्तान येथून ‘प्रोटोन एम रॉकेट’ 3 नेविगेशन उपग्रह प्रक्षेपित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता त्याचा व्हिडिओ आहे.

Avatar

Title:पाकिस्तानच्या असफल क्षेपणास्त्र चाचणीचा हा व्हिडिओ आहे का, वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False