उत्तर प्रदेशमध्ये चार मे रोजी नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यांतर्गत 37 जिल्ह्यांमध्ये मतदान पार पडले. तत्पूर्वी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कथित जाहिर केलेल्या आश्वासनपत्रातचे ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. 

त्यामध्ये अखिलेश यादव "2000 मशिदी बांधण्यात येतील आणि मागासवर्गीयांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिम सामाजाला दिले जाईल" असे वादग्रस्त आश्वसन दिल्याचा दावा केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली

पडताणळीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक कार्ड बनावट आहे. अखिलेश यादव यांनी असे कोणतेही आश्वासन दिलेले नाही. चुकीच्या दाव्यासह ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल ग्राफिकमध्ये लिहिलेले की, "पश्चिम उत्तर प्रदेश व पूर्वांचलमध्ये नविन 2000 मस्जिद बनवले जातील, अयोध्याच्या बाबरी मस्जिदसाठी 1000 कोटी रुपये दिले जातील, आयोध्याचे नाव बदलण्यात येईल आणि मागासवर्गीयांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिम सामाजाला दिले जातील, तसेच लव जिहाद कायदा रद्द करण्यात येईल."

युजर्स ग्राफिक शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश सरकारने दिलेले आश्वासन, आपण मतदान काळजीपूर्वक करावे.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

अखिलेश यादव यांनी असे वादग्रस्त विधान केले असते तर नक्कीच मोठी बातमी झाली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी वृतपत्रात किंवा सोशल मीडियावर आढळली नाही.

या वादग्रस्त दाव्याची पुष्टी करण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने सामाजवादी पक्षाचे प्रवक्ता नासिर सलीम यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, व्हायरल ग्राफिक बनावट असून समाजवादी पक्षाने असे कोणतेही आश्वासनपत्र जाहीर केले नाही. तसेच पक्षाने ट्विट करून स्पष्ट केले आहे की, व्हायरल ग्राफिक बनावट आहे.

समाजवादी पक्षाच्या फॅक्ट-चेक अकाउंटवर 11 जानेवारी 2022 रोजी ट्विट शेअर करून स्पष्ट करण्यात आले की, व्हायरल ग्राफिक कार्ड बनावट आहे.

ट्विटच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “भाजप आणि ट्रोल आर्मीद्वारे सामाजवादी पक्षाच्या विरोधात फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेक स्क्रीनशॉट शेअर केले जात असून, ते चुकीचे आहेत. सपा सत्तेत आल्यावर अफवा पसरवणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.”

https://twitter.com/SP_factCheck/status/1480928375418114059?s=20

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेले ग्राफिक कार्ड बनावट आहे. समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादवने असे कोणतेही आश्वासनपत्र जाहीर केलेले नाही. चुकीच्या दाव्यासह ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:अखिलेश यादव यांनी 2000 मशिदी बांधण्याचे आश्वासन दिले नाही; बनावट ग्राफिक व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate

Result: False