
एक्झिट पोलची हवा करून देशभर असे प्रकार समोर येत आहेत…..हे प्रकार आहेत उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील. खासगी वाहनं व दुकानांमध्ये ईव्हीएम, फेरफार होत असल्याचा संशय अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

तथ्य पडताळणी
हा व्हिडिओ पाहिल्यावर तो नेमका कुठला आहे हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला या व्हिडिओतील एका भिंतीवर रिझर्व स्ट्रॉग रुम 381 सकलडोहा विधानसभा क्षेत्र असे लिहिलेले दिसून येते. हे काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला chandauli.nic.in हे संकेतस्थळ आम्हाला दिसून आले. या संकेतस्थळावरुन माहितीनुसार हे एक मतदान केंद्र असल्याचे दिसून येते.

चन्दौलीचे जिल्हा निवडणूक अधिकारी नवनीत सिंह चहल यांनी एक प्रसिध्दी पत्रक काढून खुलासा केला असल्याचेही आम्हाला दिसून आले. आपण हे प्रसिध्द पत्रक खाली पाहू शकता.
आम्ही याबाबतचा आमचा शोध आणखी पुढे नेत असताना आम्हाला निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या श्याफाली शरण यांचे एक ट्विट दिसून आले. हे ट्विट तुम्ही खाली पाहू शकता.
पत्र सुचना कार्यालयाने याबाबत दिलेले स्पष्टीकरणही तुम्ही खाली वाचू शकता.

निष्कर्ष
या व्हिडिओत दाखवण्यात आलेल्या EVM या वापर न झालेल्या होत्या. त्या सर्व उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांना माहिती देऊन ठेवण्यात येत होत्या. एका राजकीय पक्षांच्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्थलांतरित करण्यात याव्यात अशी मागणी केली होती. त्या संबंधित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमोर जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित राजकीय पक्षाने लिखित स्वरुपात त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. याठिकाणी 24 तास पहारा ठेवण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:तथ्य पडताळणी : उत्तर प्रदेशात EVM मध्ये फेरफार होत आहे का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
