तथ्य पडताळणी : बुरखा बंदीवरुन शिवसेनेत ‘सामना’

True राजकीय

(फोटो सौजन्य : yinbuzz.com)

बुरखा बंदीवरुन शिवसेना नेत्यांमध्ये मतभिन्नता झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या वृत्ताची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

बुरखा बंदीवरुन शिवसेना नेत्यांमध्ये मतभिन्नता झाली आहे का याची पडताळणी करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम आम्ही दैनिक सामनात याबाबत काही प्रसिध्द झाले आहे का? याची पडताळणी केली. त्यावेळी आम्हाला दिनांक 1 मे 2019 रोजी प्रसिध्द झालेला खालील अग्रलेख दिसून आला.

अक्राईव्ह

संजय राऊत यांनी ट्विटरवरही आपली ही भूमिका मांडली असल्याचे आम्हाला दिसून आले.

दैनिक सकाळच्याच yinbuzz.com या संकेतस्थळात संजय राऊत उध्दव ठाकरेंनाही ऐकेनात असे शीर्षक असलेले वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात असलेल्या व्हिडिओत सामनाची भूमिका ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्याचे दिसून येते.

दैनिक लोकमतनेही याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तातही बुरखाबंदीवरुन शिवसेनेत मतभेद निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे.

अक्राईव्ह

निष्कर्ष

बुरखा बंदीवरुन शिवसेना नेत्यांमध्ये मतभिन्नता झाल्याचे विविध नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन दिसून येते. फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीत ही पोस्ट सत्य आढळली आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : बुरखा बंदीवरुन शिवसेनेत ‘सामना’

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: True