राहुल गांधी, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांची काश्मीरबद्दलची ‘ही’ वक्तव्ये खरी आहेत का ?

Mixture/अर्धसत्य राजकीय
 • 1
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1
  Share

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, निवडणूक जिंकल्यानंतर काश्मीरमधील सेना हटवणार असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे असा दावा करण्यात आला आहे. याशिवाय काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरंस् चे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला आणि जम्मु – काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या बद्द्लही पोस्टमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत फेसबुकवर ही पोस्ट विकास मुकादम या व्यक्तीच्या अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे. या पोस्टला 351 शेअर, 290 लाईक्स आणि 90 कमेंटस् मिळाल्या आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह  

सत्य पडताळणी

राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीर संदर्भात व्हायरल होणाऱ्या पोस्ट विषयी नेमके काय मत मांडले आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती शोधली. या संकेतस्थळावर कॉंग्रेस पक्षाच्या लोकसभा 2019 जाहीर पत्रकावर क्लिक केल्यानंतर खालील माहिती समोर आली.

या जाहीरनाम्यामध्ये असे म्हटले आहे की, जर कॉंग्रेसची सत्ता आली तर जम्मू काश्मीरमधील सुरक्षा दलांची संख्या कमी करण्यात येईल. तसेच काश्मीर पोलिसांची कायदा, सुरक्षा, व्यवस्था नियंत्रणासाठी काम करण्यास मदत घेण्यात येईल.

तसेच The Armed Forces (Special Powers) Act and the Disturbed Areas Act म्हणजेच सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याचा पुनर्विचार करण्यात येईल असे म्हटले आहे.

आज तकअर्काईव्ह

त्यानंतर पोस्टमध्ये जम्मू काश्मीर माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काश्मीर मध्ये नवीन पंतप्रधान बनवू असे वक्तव्य केल्याचे म्हटले आहे. या विषयावर बोलताना ओमर अब्दुल्ला यांनी काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाकडे सत्ता आली तर 1953 साली जम्मू – काश्मीरसाठी शिमला कराराआधी जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती जम्मू – काश्मीरमध्ये आणू. त्याच अनुषंगाने त्यांनी मग त्यानंतर जम्मू –  काश्मीरमध्ये नवीन पंतप्रधान बनवू असे वक्तव्य केले आहे. याबद्दल विविध प्रसार माध्यमांमध्ये या विषयावर बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पत्रिकाअर्काईव्ह
लाईव्ह हिंदुस्तान डॉट कॉमअर्काईव्ह  

त्यानंतर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये 2020 मध्ये काश्मीर भारतापासून वेगळे करु असे वक्तव्य जम्मु – काश्मीर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केल्याचा दावा केला आहे. काश्मीर संदर्भातील कलम 370 हटविल्यास जम्मू – काश्मीर हे राज्य भारतापासून वेगळे होऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर वृत्त वाचू शकता.

जनसत्ताअर्काईव्ह
द इकॉनॉमिक्स टाईम्सअर्काईव्ह

या विषयावर युट्युबवरही व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून, तो आपण खाली पाहू शकता.

अर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये एका फोटोमध्ये तीन दावे करण्यात आले आहे.

 1. निवडणूक जिंकली तर काश्मीरमधील सेना हटवू :  राहुल गांधी
 2. त्यानंतर काश्मीरमध्ये नवीन पंतप्रधान बनवू : ओमर अब्दुल्ला
 3. 2020 मध्ये काश्मीर भारतापासून वेगळे करु :  मेहबुबा मुफ्ती

संपुर्ण व्हायरल होणाऱ्या पोस्ट संदर्भात संशोधन केले असता या पोस्टमध्ये देण्यात आलेला पहिला दावा हा असत्य आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक जिंकली तर काश्मीरमधील सेना हटवू असे म्हटले नाही. कॉंग्रेसच्या 2019 च्या लोकसभा निवडणूकीच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणूक जिंकली तर काश्मीर व्हॅलीत आर्मी आणि सीआरपीएफ यांच्या संख्येत कमी करण्यात येईल. तसेच काश्मीर पोलिस यांची कायदा, सुरक्षा, व्यवस्था नियंत्रणासाठी काम करण्यास मदत घेण्यात येईल. तसेच The Armed Forces (Special Powers) Act and the Disturbed Areas Act म्हणजेच सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याचा पुनर्विचार करण्यात येईल असे म्हटले आहे.

दुसऱ्या नंबरचा दाव्यामध्ये काश्मीरमध्ये नवीन पंतप्रधान बनवू असे वक्तव्य ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे, असे म्हटले आहे. हा दावा सत्य आहे.

तिसऱ्या नंबरचा दाव्यामध्ये 2020 मध्ये काश्मीर भारतापासून वेगळा करु असे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. हा दावा अर्धसत्य असून, कलम 370 वगळल्यास काश्मीर भारतापासून वेगळे होऊ शकते अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.

सर्व संशोधनाअंती असे आढळून आले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट निवडणूक जिंकल्यानंतर काश्मीरमधील सेना हटवणार असे राहुल गांधी यांनी म्हटले, ही पोस्ट संमिश्र आहे.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर राहुल गांधी, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी केलेल्या वक्तव्यांची व्हायरल होणारी पोस्ट ही संमिश्र आहे.

Avatar

Title:राहुल गांधी, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांची काश्मीरबद्दलची ‘ही’ वक्तव्ये खरी आहेत का ?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False


 • 1
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1
  Share