हा नेदरलँडमधील ‘गाणारा रस्ता’ नाही. जाणून घ्या काय असतो ‘म्युझिकल हायवे’

False आंतरराष्ट्रीय राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

कल्पना करा की, तुम्ही हायवेने जात असताना रस्ता गाऊ लागला तर? जशी जशी गाडी पळेल तसे तसे रस्त्यातून संगीत ऐकू येऊ लागले तर? जरा अतिशयोक्ती वाटतेय ना?  परंतु, अशाच एका रस्त्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर प्रचंड शेयर होत आहे. जगातील हा पहिलाच ‘संगीत महामार्ग’ नेदरलँडमध्ये तयार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याबद्दल पडताळणी केली आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

सुमारे एका मिनिटाच्या या व्हिडियोमध्ये कार जेव्हा रस्त्यावरील म्युझिकल नोट्सवरून जाते तेव्हा संगीत ऐकू येते. सोबतच्या मेसेजे म्हटले जातेय की, हा जगातील पहिला ‘सिंगिंग रोड’ आहे. नेदरलँडमधील या रस्त्यावरून जर 60 किमी प्रतितासाच्या वेगाने वाहन चालवले तर रस्त्यातून असे संगीत ऐकू येते.

तथ्य पडताळणी

हाच व्हिडियो फेसबुक आणि युट्यूबवर गेल्या महिन्यापासून हा इंटरनेटवर व्हायरल होत आहे. अधिक शोध घेतल्यावर कळाले की, हंगेरीतील या रस्त्याचे नाव हायवे क्रमांक 67 आहे. 

सर्वप्रथम हा रस्ता कुठला आहे हे पाहू. व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर रस्त्याच्या बाजूला एक पाटी दिसते. त्यावर Zenélo út असे लिहिले आहे. गुगलवर याचा शोध घेतला तेव्हा कळाले की, रस्ता हंगेरी देशातील आहे. Zenélo út या शब्दाच्या अर्थ होतो ‘संगीत रस्ता’.

हंगेरीतील हायवे क्रमांक 67 महामार्गावर मार्ने (Mernye) शहराच्या नजीक ही संगीत रस्त्याची पट्टी आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व विस्तार सुरू आहे. नव्या प्रकल्पांतर्गत संगीत रस्त्याची संकल्पना येथे राबविण्यात आली. ऑस्ट्रेयातील स्ट्राबॅग नावाच्या कंपनीने हा संगीत रस्ता तयार केला आहे. 

मूळ बातमी येथे वाचा – CURBED

या रस्त्यावरून सरासरी 80 किमी प्रतितासाच्या वेगाने गाडी चालविल्यावर रिपब्लिक नावाच्या बँडचे हंगेरीरियन भाषेतील – 67-es út (Route 67) – गाण्याची धून ऐकू येते. हा मुझिकल हायवे तेथील नागरिकांसाठी आकर्षण कमी आणि डोकेदुखी जास्त ठरत आहे. या रस्त्याचा होणारा आवाज आसपासच्या रहिवाशांना त्रासदायक वाटतो. तो लवकरत लवकर बंद करावा अशीदेखील लोकांनी मागणी केली आहे.

यावरून हे स्पष्ट होते की, हा रस्ता नेदरलँडमधील नसून, हंगेरीतील आहे. मग हा जगातील पहिला संगीत रस्ता आहे का? नाही.

जगातील पहिला संगीत रस्ता (म्युझिकल हायवे) डेन्मार्क देशात 1995 साली बांधण्यात आल होता. त्याचे नाव Asphaltophone होते. स्टीन क्रॅरूप येनसेन आणि जेकब फ्रॉईड मॅग्नस या दोन डॅनिश कलाकारांनी तो तयार केला होता. या रस्त्याची त्याकाळातील मूळ क्लिप तुम्ही खाली पाहू शकता. जगात त्यानंतर हंगेरी, जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, चीन, इराण, सॅन मॅरिनो, तैवान, नेदरलँड आणि युक्रेनमध्ये असे संगीत रस्ते आहेत.

काय असतो संगीत रस्ता?

कंपणापासून संगीत तयार होते. रस्त्यावर एका विशिष्ट पद्धतीने आणि ठराविक अंतरावर चर/खोबण पाडल्या जातात. त्यावरून जेव्हा वाहनं एका निश्चित वेगाने जातात तेव्हा चाकामुळे कंपण तयार होऊन संगीत ऐकू येते. हे कसे केले जाते याविषयी नॅशनल जिओग्राफिक चॅनेलने व्हिडियो तयार केलेला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.

निष्कर्ष

सोशल मीडियावर व्हायरल होणारा संगीत रस्त्याचा व्हिडियो हंगेरीतील आहे. तो नेदरलँडचा नाही. तसेच हा जगातील पहिला संगीत रस्ता नाही. पहिला संगीत रस्ता डेन्मार्कमध्ये 1995 साली सुरू झाला होता. आपल्याकडेदेखील काही शंकास्पद व्हिडियो/फोटो/मेसेज असतील तर व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) फॅक्ट चेकसाठी पाठवा.

Avatar

Title:हा नेदरलँडमधील ‘गाणारा रस्ता’ नाही. जाणून घ्या काय असतो ‘म्युझिकल हायवे’

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •