कोरोनाच्या एक कोटी रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले का? वाचा सत्य

Coronavirus False

इंडिया टीव्ही वृत्त वाहिनीवरील एका बातमीचा स्क्रीनशॉट शेयर करून दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात एका कोटी कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले, असे म्हणाले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअप हेल्पलाईनवर (9049043487) हा स्क्रीनशॉट पाठवून याविषयी सत्य पडताळणी करण्याची विनंती केली.

काय आहे पोस्टमध्ये?

इंडिया टीव्ही वृत्तवाहिनीवर रविवारी प्रसारित झालेल्या बातमीचा स्क्रीनशॉट पोस्टमध्ये शेयर करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या वार्तांकनाचा हा फोटो आहे. यात लिहिले आहे की, “1 करोड कोरोना मरीजों का फ्री में इलाज किया गया”

यावरून चर्चा सुरू झाली आहे की, भारतात खरंच इतके कोरोनाबाधित रुग्ण आहेत का?

indiavt.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांनी असे काही विधान केले का याचा शोध घेतला. रविवारी (31 मे) रोजी पंतप्रधानांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला होता. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर या कार्यक्रमाची रेकार्डिंग उपलब्ध करून देण्यात आली आहे. ती तुम्ही आली ऐकू शकता.

संपूर्ण व्हिडियोमध्ये पंतप्रधानांनी “एक कोटी कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले” असे विधान केलेले नाही. व्हिडियोच्या 17.55 मिनिटांपासून नरेंद्र मोदी ‘आयुष्मान भारत’ या योजनेबद्दल बोलू लागतात. 

ते म्हणातात की, दीड वर्षांपूर्वी गोरगरीब जनतेसाठी ‘आयुष्मान भारत’ योजना सुरू करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच या योजनेतील लाभार्थींचा आकडा एक कोटींपेक्षा जास्त झाला आहे.

रविवारच्या ‘मन की बात’ संबोधनाची संपूर्ण ट्रान्सस्क्रिप्ट पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर दिलेली आहे. 

mann-1.png

मूळ वेबसाईटला येथे भेट द्या – PMIndia

मग इंडिया टीव्हीने अशी बातमी का दिली?

इंडिया टीव्ही वृत्तवाहिनीने याबाबत खुलास केला आहे की, मानवी चुकीमुळे बातमीमध्ये एक कोटी कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार कऱण्यात आला असा उल्लेख करण्यात आला. भारतात एवढे जास्त कोरोनाचे रुग्ण नाहीत. आमच्या चुकीसाठी खेद आहे.

अर्काइव्ह 

व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटमध्येदेखील ‘आयुष्मान भारत’ योजनेचा उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ मोदी गेल्या दीड वर्षांमध्ये ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत उपचार घेतलेल्या रुग्णांबद्दल बोलत होते आणि बातमीमध्ये चुकीने त्याचा उल्लेख कोरोनाबाधित रुग्ण असा करण्यात आला.

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा किती आहे?

2 जून सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाच्या 97 हजार 581 सक्रीय केसेस असून 5598 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. त्याचबरोबर 95 हजार 526 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

dddsa.png

ही आकडेवारी तुम्ही आरोग्य येथे पाहू शकता – MyGov 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, एक कोटी कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत इलाज करण्यात आला असे मोदी यांनी म्हटलेले नाही. इंडिया टीव्हीने चुकीने तशी बातमी दिली होती. चूक लक्षात आल्यानंतर वृत्तवाहिनीने याबाबत खुलास करीत मानवी चुकीमुळे तसे झाले असे म्हटले आहे.

Avatar

Title:कोरोनाच्या एक कोटी रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False