FAKE NEWS: मुलींना नमाज पठण करायला लावणाऱ्या शिक्षकाला मनसे कार्यकर्त्यांना चोप दिला का? 

False राजकीय

भगव्या शाल असणारे कार्यकर्ते एका व्यक्तीला सुनावत असल्याचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, महाराष्ट्रातील एका ख्रिश्चन शाळेत मुस्लिम शिक्षकाने विद्यार्थिनींना जबरदस्तीने नमाज पठण करायला लावल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याच शिक्षकाला त्या मुलींना भगवी ओढणी घालायला लावली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. हा व्हिडिओ नाशिकमधील एका सिनेमागृहात झालेल्या वादाचा आहे. 

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये काही कार्यकर्ते एका व्यक्तीला महिलांची माफी मागून त्यांना भगवी शाल घालण्यास सांगत आहेत. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, महाराष्ट्रतील एका ख्रिश्चन शाळेत मुस्लिम शिक्षक मुलींना जबरदस्तीने नमाज पठण करायला लावायचा. राज ठकारेंच्या मनसे कार्यकर्त्यांनी त्याच शिक्षकाला मुलींना भगवी शाल घालायला लावली.

फेसबुकट्विटर

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा व्हिडिओ नेमका कुठला आहे ते शोधले. कीवर्ड सर्चद्वारे रिपब्लिक भारत चॅनेलवर या व्हिडिओविषयीची बातमी आढळली. त्यानुसार, नाशिकमधील एका थिएटरमध्ये काश्मीर फाईल्स चित्रपट पाहायला आलेल्या महिलांना तेथील कर्मचाऱ्यांनी भगवे शेले घालून चित्रपटा पाहायला जाण्यास मनाई केली होती. 

या प्रकारानंतर संतप्त महिलांनी थिएटर कर्मचाऱ्यांवर आक्रमक होत गोंधळ घातला. गर्दी जमा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनाच महिलांना भगवे शेले घालायला लावून चित्रपटाचा शो सुरू करण्यात आला होता. 

टीव्ही-9 मराठी वेबसाईटच्या बातमीनुसार, नाशिकच्या कॉलेज रोडवरील पीव्हीआर चित्रपटगृहात जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचा शो आयोजित करण्यात आला होता. परंतु, थिएटर कर्मचाऱ्यांनी आलेल्या महिलांना भगवे शेले बाहेर काढण्यास सांगितल्यामुळे वाद निर्माण झाला होता. महिलांनी घोषणाबाजी करून काही काळ वातावरण तापले होते. परंतु, घटनास्थळी पोलिस आल्यावर समेट घडवून आणण्यात आली. 

फॅक्ट क्रेसेंडोने मनसे पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, “या व्हिडिओसोबत केला जाणारा नमाज पठणाचा दावा खोटा आहे. हा व्हिडिओ शाळेतील नसून, चित्रपटगृहातील आहे. नाशिकमध्ये मनसेचे अनेक खूप कार्यकर्ते आहेत. त्यामुळे व्हिडिओत दिसणारे कार्यकर्ते मनेसेचे नाहीत असे सांगणे कठीण आहे.”

नाशिकचे पुलिस आयुक्त दीपक पांडे यांनीसुद्धा फॅक्ट क्रेसेंडोशी बोलताना सांगितले की, हा व्हिडिओ नाशिकमधील थिएटरचा आहे.

“काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान हा प्रकार घडला होता. थिएटर कर्मचाऱ्यांनी भगवे शेले जमा केले; परंतु नंतर ते परत करण्यात आले. सुमारे तीन आठवड्यांपूर्वी ही घटना घडली होती,” असे त्यांनी सांगितले.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, ख्रिश्चन शाळेत मुस्लिम शिक्षक मुलींना जबरदस्तीने नमाज पठण करण्याचा दावा बनावट आहे. हा व्हिडिओ अशा कोणत्याही घटनेचा नाही. हा नाशिकमधील एका थिएटमध्ये भगवे शेले घालण्यावरून झालेल्या वादाचा आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:FAKE NEWS: मुलींना नमाज पठण करायला लावणाऱ्या शिक्षकाला मनसे कार्यकर्त्यांना चोप दिला का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False