मद्यपान हे कोरोनापासून बचावासाठी योग्य प्रतिबंधक उपाय आहे का?

Coronavirus False वैद्यकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

देशभरात आतापर्यंत कोराना व्हायरसचे 30 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये यामुळे हजारो जणांना याची बाधा झाली असून 3280 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात 95 हजार 270 रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसबद्दल समाजमाध्यमातही वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यातील एक दावा मद्यपान केल्याने कोरोनापासून बचाव होत असल्याचा आणि तो प्रतिबंधात्मक उपाय असल्याचा आहे. पुणेरी टोमणे या फेसबुक पेजवरुनही असाच दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे.

Puneri Tomne.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

मद्यपान केल्याने कोरोनापासून बचाव होतो का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम शोध घेतला. त्यावेळी हिंदी भाषेतून प्रकाशित होणाऱ्या दोपहर का सामना या दैनिकातील 14 फेब्रुवारी 2020 रोजीच्या मुखपुष्ठावरील एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्ताच्या शीर्षकात “अब कैसा रोना ! एक पैग में पैक होगा कोरोना ! अल्कोहल से यह जानलेवा वायरस को एलर्जी |” असे म्हटले असल्याचे दिसून आले. केवळ एका पेगमध्ये कोरोनाचा इलाज होऊ शकतो आणि अल्कोहल हे या विषाणूसाठी मारक असल्याचे या शीर्षकातून सूचित करण्यात आले आहे. 

Archive

त्यानंतर आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. त्यावेळी आम्हाला आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने केलेले एक फॅक्ट चेक दिसून आले. या फॅक्ट चेकमधील स्क्रीटशॉट घेत ते असत्य माहितीसह समाजमाध्यमात पसरविण्यात येत असल्याचे हा व्हिडिओ पाहिल्यावर स्पष्ट झाले. या फॅक्ट चेकमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देत मद्यपान, गांजा यामुळे कोरोनापासून बचाव होत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने बचावात्मक उपायांची माहिती देताना हात स्वच्छ करताना अल्कोहल युक्त हॅण्डवॉशचा वापर करण्याविषयी सुचवले असल्याचे दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेने कुठेही मद्यपानाविषयी सुचवलेले नाही.

image1.png

निष्कर्ष

मद्यपान अथवा गांजा यामुळे कोरोनापासून बचाव होत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने केवळ हात धुण्यासाठी अल्कोहलयुक्त हॅण्डवॉशचा वापर करण्याविषयी सुचवले आहे.

Avatar

Title:मद्यपान हे कोरोनापासून बचावासाठी योग्य प्रतिबंधक उपाय आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply