पंतप्रधान मोदींच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात ‘चौकीदार चोर है’ घोषणा नाहीत; वाचा सत्य

False राजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगाल दौऱ्यावर गेले असताना तेथे नागरिकांनी चौकीदार चौर है अशा घोषणा दिल्याचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात खरोखरच अशी काही घटना घडली का? हा व्हिडिओ खरा आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित पोस्ट

तथ्य पडताळणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगाल दौऱ्यावर गेले असताना तेथे नागरिकांनी चौकीदार चौर है अशा घोषणा दिल्या का? याचा शोध घेतला असता असे कोणतेही वृत्त दिसून आले नाही. त्याचवेळी आकाशवाणीच्या कोलकाता केंद्राने 22 मे 2020 रोजी त्यांच्या फेसबुक पेजवर प्रसिध्द केलेला एक व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओसोबत असलेल्या माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बशीरहाट भेट दिली आणि त्यांनी चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या पश्चिम बंगालला तातडीने 1000 कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ नीट ऐकला असता यात दिदी, भारतमाता की जय, जय श्रीराम अशा घोषणा स्पष्ट ऐकू येतात. 

संग्रहित

ज्येष्ठ पत्रकार सोम्यादिप्त बॅनर्जी यांनीही 23 मे 2020 हा व्हिडिओ ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत कोलकाताने जय श्रीरामच्या घोषणांनी केल्याचे म्हटले आहे. 

संग्रहित

बंगाल टाईम्स 24×7 या संकेतस्थळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बशीरहाट येथे भेट दिली याचे फेसबुक लाईव्ह केले होते. यातही आपण या भेटीच्या वेळी नागरिकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या हे आपण पाहू शकतो.

यातून हे स्पष्ट झाले की, चौकीदार चोर है या घोषणा व्हिडिओत संपादित करुन समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

निष्कर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात बशीरहाट येथे जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. नागरिकांनी चौकीदार चौर है अशा घोषणा दिल्याचे असत्य आहे.

Avatar

Title:पंतप्रधान मोदींच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात ‘चौकीदार चोर है’ घोषणा नाहीत; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False