Fact Check : ATM पिन क्रमांक चोरीला जाऊ नये म्हणून कॅन्सल बटन 2 वेळा दाबायचं का?

False अर्थव्यवस्था

तुमच्या एटीएमचा पिन क्रमांक चोरीला जाऊ नये यासाठी कॅन्सल बटन 2 वेळा दाबा, असा संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

तुमच्या एटीएमचा पिन क्रमांक चोरीला जाऊ नये यासाठी कॅन्सल बटन 2 वेळा दाबा, असा संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदेशात सत्यमेव जयते असे लिहिले असल्याने या संदेशावर अनेकांचा सहजच विश्वासही बसत आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर याबाबत काही माहिती मिळते का हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला. याठिकाणी अशी कोणतीही माहिती दिसून आली नाही.

अक्राईव्ह

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या ट्विटर हॅन्डलवरही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मराठीतील बोभाटा या संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त दिलेले आहे. नियमितपणे पिन क्रमांक बदलत राहणे यासारखे अन्य उपाय यात सुचविण्यात आलेले आहेत.

निष्कर्ष  

एटीएम पिन क्रमांक चोरीला जाऊ नये म्हणून कॅन्सल बटन 2 वेळा दाबावे, अशी कोणतीही सुचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेली नाही. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : ATM पिन क्रमांक चोरीला जाऊ नये म्हणून कॅन्सल बटन 2 वेळा दाबायचं का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False