Fact : अमूलच्या दुधात प्लास्टिक असल्याचे असत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

अमूल दुधात प्लास्टिकचे घटक असून ते आरोग्यास हानीकारक असल्याचा दावा करत समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या पसरत आहे. हे दुध पिण्यापुर्वी विचार करा, असे आवाहनही या व्हिडिओसोबत करण्यात येत आहे. दुध गरम केल्यावर हे प्लास्टिकचे घटक समोर येतात, असा दावाही काही जण करत आहेत. वायआरएस शेख आणि नितीन पाटील यांनीही असा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Archive 

तथ्य पडताळणी

अमूल दुधात प्लास्टिकचे घटक असून ते आरोग्यास हानीकारक असल्याचा दावा करत असलेल्या या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही सर्वप्रथम याबाबत काही माहिती मिळते का याचा शोध घेतला. त्यावेळी मिळालेल्या परिणामात आम्हाला लेटेस्ट ली या संकेतस्थळावरील 29 डिसेंबर 2019 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तात अमूलच्या दुधात प्लास्टिक असलेला व्हिडिओ बनविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. 

screenshot-marathi.latestly.com-2020.01.04-16_11_29.png

लेटेस्ट ली मराठीवरील सविस्तर वृत्त / Archive 

त्यानंतर आम्हाला गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ म्हणजेच जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी यांचा युटूयूबवर या घटनेबद्दलची माहिती देतानाचा एक व्हिडिओ दिसून आला. खालील व्हिडिओत आपण दोन मिनिटे 18 सेकंद ते 4 मिनिट 3 सेकंदापर्यंत त्यांचे म्हणणे पाहू शकता.

Archive

गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला असता त्यांनी खालील माहिती दिली. 

त्यानंतर आम्ही प्रयागराज शहरातील करनालगंज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुणकुमार त्यागी यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, अमूल कंपनीचे निशांतकुमार यांनी 28 डिसेंबर 2019 रोजी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्याचा एफआरआय क्रमांक 1155 आहे. आशुतोष शुक्ला यांच्याविरोधात (वय 38) भारतीय दंडसंहिता कलम 386 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे.

निष्कर्ष

अमूल दुधात प्लास्टिकचे घटक असून ते आरोग्यास हानीकारक असल्याचा या दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे. अमूलने हा व्हिडिओ तयार करणाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.

Avatar

Title:Fact : अमूलच्या दुधात प्लास्टिक असल्याचे असत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •