सीरियातील रक्तबंबाळ मुलाचा फोटो दिल्ली दंगीलाचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य

False राजकीय | Political सामाजिक

सोशल मीडियावर एका रक्तबंबाळ मुलाचा फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. पूर्ण चेहरा रक्ताने माखलेला हा मुलगा दिल्लीतील असल्याचा दावा केला जात आहे. दिल्ली दंगलीमध्ये हा मुलगा जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून याची पडताळणी करण्याची विनंत केली.

फेसबुकवरदेखील हा फोटो शेयर केला जात आहे. 

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो दिल्ली दंगलीतील नाही. हा फोटो तर भारतातीलसुद्धा नाही.

गेटी इमेजेस वेबसाईटनुसार हा फोटो सीरियातील आहे. 21 फेब्रुवार 2018 रोजी सीरियाच्या सैन्याने राजधानी दमास्कसच्या सीमावर्ती भागात केलेल्या हल्ल्यात हा मुलगा जखमी झाला होता. 

Embed from Getty Images

मूळ फोटो येथे पाहा – गेटी इमेजस

एक्सप्रेस युके वेबसाईटवरदेखील हाच फोटो वापरलेला आहे. तेथेदेखील हा सीरियातील जखमी मुलगा असल्याचे म्हटले आहे. 

मूळ फोटो येथे पाहा – एक्सप्रेस यूके

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, हा फोटो दिल्लीतील नाही. हा फोटो दोन वर्षांपूर्वी सीरियामध्ये झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचा हा फोटो आहे. याचा भारत किंवा दिल्ली दंगलीशी काही संबंध नाही.

Avatar

Title:सिरीयातील रक्तबंबाळ मुलाचा फोटो दिल्ली दंगीलाचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False