चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी मशिदीस भेट दिल्याचा जुना व्हिडिओ खोटा दाव्यासह व्हायरल

Partly False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मशिदीला भेट दिली आणि सध्या संकटात असलेल्या देशासाठी दुआ मागण्याची मुस्लिमांना विनंती केली. आम्हाला तुमची मदत हवी आहे, असे ते म्हणाल्याच्या माहिती सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकतीच मशिदीला भेट दिल्याचा हा व्हिडिओ आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.02.06-10_09_15.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी 

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मशिदीला भेट दिल्याच्या या व्हिडिओविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही नीट पाहिला. त्यावेळी या व्हिडिओवर आम्हाला सीसीटीव्ही असे लिहिले असल्याचे आम्हाला दिसून आले. 

C:\Users\Dell\Downloads\cctv.png

त्यानंतर आम्ही या व्हिडिओचा युटुयुबवर शोध घेतला असता चीनची अधिकृत सरकारी माध्यम संस्था असलेल्या सीसीटीव्हीने 21 जुलै 2016 रोजी याबाबतचे वृत्त दिल्याचे दिसून आले. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीनुसार चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी यिनचुआन शहरातील झिंनचेंग मशिदीस भेट दिली. पश्चिमोत्तर चीनमधील निंगक्सिया हुई स्वायत्त प्रदेशाच्या दौर्‍यावर असताना त्यांनी या मशिदीची पाहणी केली. चिनी राष्ट्रपतींनी मशिदीच्या बाहेर इमाम आणि इस्लामच्या अनुयायांशी संवाद साधला.

Archive  

यातून ही बाब स्पष्ट झाली की, कोरोना व्हायरसची साथ उद्भवल्यानंतर चुकीच्या माहितीसह हा व्हिडिओ समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहे.

निष्कर्ष 

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 2016 मध्ये मशिदीला दिलेल्या भेटीचा हा व्हिडिओ आहे. त्याचा कोरोना व्हायरसच्या साथीशी कोणताही संबंध नाही.

Avatar

Title:चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी मशिदीस भेट दिल्याचा जुना व्हिडिओ खोटा दाव्यासह व्हायरल

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Partly False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •