दीर्घकाळ मास्क वापरल्याने व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो का? वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

मास्क हे मर्यादित व विशिष्ट वेळेसाठी वापरावे जर ते आपण अधिक काळ वापरल्यास रक्ताचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. मेंदूला ऑक्सिजनचा होणारा प्रवाह कमी होतो किंवा मंदावतो. तुम्हाला अशक्तपणा जाणवू लागतो. परिणामी मृत्यू होण्याची शक्यता बळावते, असा एक संदेश सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. मुंबईतील कस्तुरबा हॉस्पीटलमधील डॉ. जयवंत लेले यांच्या नावाने हा संदेश पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या संदेशाची तथ्य पडताळणी केली आहे.

Mask Claim.png

फेसबुकवरील पोस्ट / संग्रहित पोस्ट

तथ्य पडताळणी

मास्क जास्त वेळ वापरल्याने खरोखरच मृत्यू ओढावू शकतो का? हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला. त्यावेळी असे कोणतेही वृत्त दिसून आले नाही. त्यानंतर मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात संपर्क केल्यावर तेथे डॉ. जयवंत लेले नावाचे डॉक्टर नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही हा संदेश खोटा असल्याचे स्पष्ट केले. मास्क घातल्याने मृत्यू झाल्याची एकही घटना आजपर्यंत घडलेली नाही. अनेक वैद्यकीय तज्ज्ञ, पोलीस तासनतास मास्क घालतात, त्यांनाही याबाबत त्रास होत असल्याचे म्हटलेले नाही. सर्वसामान्य लोक कापडी मास्क वापरतात, याचा एसीमध्येही कोणताही त्रास होत नाही. घरात कोणी खोकत किंवा शिंकत असेल तर मास्क वापरणे चांगलेच आहे. घरात बाहेरुन एखादी व्यक्ती येत असेल तर तिने मास्क वापरावा, असे त्यांनी सांगितले. 

screenshot-www.cdc.gov-.png

अमेरिकेतील सेंटर फॉर डिजिज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन या संस्थेने कोणी मास्क वापरू नये, याबाबत दिलेल्या माहितीत दोन वर्षाखालील लहान मुले, श्वसनासंबंधी त्रास असलेल्या व्यक्ती, ज्या व्यक्तींना इतरांच्या मदतीशिवाय स्वत:ला मास्क काढता येत नाहीत, अशा व्यक्तींनी मास्क घालू नये अशी सुचना केली आहे.

सीडीसीचे संकेतस्थळ / संग्रहित

निष्कर्ष

यातून हे स्पष्ट झाले की, ज्यांना श्वसनासंबधित आजार आहेत, त्यांना कोविड-19 संबंधित मास्क घट्ट घातल्यास थोडा त्रास होऊ शकतो मात्र दीर्घकाळ मास्क घातल्याने ऑक्सिजनची कमतरता होऊन व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, हा दावा असत्य आहे.

Avatar

Title:दीर्घकाळ मास्क वापरल्याने व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False