
मधुमेह आणि कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी रोज ‘शेंगदाणे खा’ असा दावा मराठीमीडिया डॉट कॉम या संकेतस्थळाने केला आहे. जे फायदे बदाम खाल्ल्याने होतात तेच फायदे शेंगदाणे खाल्ल्याने होत असल्याचा दावाही या संकेतस्थळाने केला आहे.

तथ्य पडताळणी
मधुमेह आणि कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी रोज ‘शेंगदाणे खा’ असा दावा करणारे वृत्त मराठी डॉट ईनाडूइंडिया डॉट कॉमनेही दिले आहे. शेंगदाण्यामुळे ह्दय तंदुरुस्त राहते, असा दावाही यात करण्यात आला आहे.

http://www.peanut-institute.org या संकेतस्थळावर आम्हाला शेंगदाणे हे आरोग्यासाठी चांगले असल्याचा अहवाल आम्हाला दिसून आला. ह्दयासाठी शेंगदाणे चांगले असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

कर्करोगासंबधी माहितीची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही www.cancer.gov या संकेतस्थळावर गेलो शेंगदाण्यावर असलेल्या बुरशी व सुक्ष्मजीवांमुळे कर्करोगाची शक्यता यात व्यक्त करण्यात आल्याचे दिसून आले. सामान्यपणे चांगले शेंगदाणे मात्र कर्करोगाविरोधात उपयुक्त असल्याचे मत अन्य सर्व संकेतस्थळांनी व्यक्त केले आहे.

http://apjcn.nhri.org.tw (आक्राईव्ह लिंक) या संकेतस्थळानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी शेंगदाणे उपयुक्त असल्याचेhttps://www.medicalnewstoday.com (आक्राईव्ह लिंक) या संकेतस्थळाने म्हटले आहे. peanut-institute.org या संकेतस्थळाने शेंगदाण्यामुळे रक्तप्रवाह सुरळित होत असल्यास दुजोरा दिला आहे.

parenting.firstcry.com या संकेतस्थळाने शेंगदाणे हे गर्भवती महिलांसाठी चांगले असले तरी त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात, असे मत व्यक्त केले आहे.

नैराश्यावर मात करण्यासाठी शेंगदाणे हे उपयुक्त असल्याचे मत www.curejoy.com या संकेतस्थळावर व्यक्त करण्यात आले आहे.

निष्कर्ष
मधुमेह आणि कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी रोज ‘शेंगदाणे खा’ हा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीत सत्य आढळून आला आहे.

Title:सत्य पडताळणी : मधुमेह आणि कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी रोज ‘शेंगदाणे खा’
Fact Check By: Dattatray GholapResult: True
