तथ्य पडताळणी : राहुल गांधींनी शहीदांचा योग्य तो सन्मान राखला नाही का?

False राजकीय

पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहताना राहुल गांधी यांनी शहीदांचा योग्य तो सन्मान राखला नाही  अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहताना राहुल गांधी यांनी शहीदांचा योग्य तो सन्मान राखला नाही का? याची पडताळणी करण्यासाठी आम्ही या घटनेचा व्हिडिओ शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला खालील व्हिडिओ दिसून आला.

या व्हिडिओत 45 मिनिटे 50 सेकंद ते 46 मिनिटे 50 सेकंद या कालावधीत त्यांनी शहीदांना श्रध्दांजली वाहिल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर एक मिनिट 18 व्या सेकंदाला ते काही चाचपताना आणि त्यानंतर मोबाईल हातात घेतलेले दिसून येतात. त्यांनी एक मिनिट 18 सेकंद ते 1 मिनिटे 48 सेकंदापर्यंत त्यांच्या हातात मोबाईल घेतला असल्याचे दिसून येते. त्यानंतर ते लष्करी अधिकाऱ्यासोबत बोलताना दिसून येत आहेत. राहुल गांधींनी जवळपास 30 सेकंदासाठी मोबाईल हातात घेतला असून त्यांच्या बोटांची हालचालही दिसून येत आहे. राहुल गांधी मोबाईलवरुन कुणाशी बोलत असल्याचे या व्हिडिओत दिसून येत नाही. त्यानंतर राहुल गांधी हे स्थिरपणे उभे असल्याचे दिसत आहे. त्याचे या ठिकाणाहून प्रस्थान होईपर्यत हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यास ते पंतप्रधान मोदींपाठोपाठ या ठिकाणावरुन निघून गेल्याचे दिसून येते.

निष्कर्ष

पुलवामा हल्ल्यातील शहीदांना अभिवादन करुन राहुल गांधी यांनी त्यांना योग्य तो सन्मान दिला आहे. यावेळी ते फोनवरुन कुणाशी बोलत असल्याचे दिसून येत नाही. त्यांनी काही सेकंदासाठी मोबाईल हातात घेतल्याचे दिसून येते. पोस्टकर्त्याने केलेला पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहताना राहुल गांधी यांनी शहीदांचा योग्य तो सन्मान राखला नाही हा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : राहुल गांधींनी शहीदांचा योग्य तो सन्मान राखला नाही का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False