स्टारचे चिन्ह असलेली 500 रूपयांची नोट बनावट असल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य
गेल्या काही दिवसांपासून स्टारचे चिन्ह (*) असलेल्या 500 रुपयांच्या नोटांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यासोबत दावा केला जात आहे की, असे स्टारचे चिन्ह असलेली 500 रूपयांची नोट बनावट आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, स्टारचे चिन्ह असलेली 500 रूपयांची नोट बनावट नाही. चुकीच्या दाव्यासह नोट बनावट असल्याची अफवा व्हायरल होत आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये स्टारचे चिन्ह (*) असलेल्या 500 रुपयांची नोटा दाखवलेली आहे.
हा फोटो शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “गेल्या 2-3 दिवसांपासून * चिन्ह असलेल्या या 500 च्या नोटा बाजारात चलनात येऊ लागल्या आहेत. अशी नोट काल इंडसइंड बँकेतून परत केली. ही बनावट नोट आहे. आजही एका मित्राला ग्राहकाकडून अशा 2-3 नोटा मिळाल्या होत्या, पण लक्ष गेल्याने लगेच परत केल्या. ही नोट सकाळी कोणीतरी दिल्याचेही ग्राहकाने सांगितले. काळजी घ्या. बाजारात असेल बनावट नोटा घेऊन फिरणाऱ्याची संख्या वाढली आहे.”
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, आरबीआयने 16 डिसेंबर 2016 रोजी महात्मा गांधी सीरिजमधील नवीन 500 रूपयांच्या नोटांसंदर्भात एक प्रेस नोट जारी केली होती.
ज्यामध्ये 500 रुपयाच्या नोटांच्या क्रमांकामध्ये 'E' अक्षर आणि स्टारच चिन्ह (*) सादर केले होते.
मूळ पोस्ट – आरबीआय
तसेच आधीपासून स्टार चिन्ह असलेल्या 10,20, 50 आणि 100 रुपयाच्या नोटा 2006 पासून चलनात आहेत.
आरबीआयने 19 एप्रिल 2006 रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात तपशीलवार दिली होती की, सदोष छापील बँक नोटा बदलण्यासाठी 100 भाग असलेले स्टार मालिका क्रमांकाच्या योजनेचा प्रस्ताव देण्यात आला होता.
तसेच या नोटा सरकार मान्य आहेत असा देखील उल्लेख येथे केला आहे.
मूळ पोस्ट – आरबीआय
बँकमध्ये नोटा स्वीकारण्यास नकार दिला तर काय?
आरबीआयच्या मार्गदर्शकतत्वानुसार, कोणतेही विशेष कारण नसताना बँक आपल्या नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. परंतु असे झाल्यास आपण वरिष्ठ अधिकारी किंवा शाखेत तक्रार करू शकता किंवा cms.rbi.org.in. या संकेतस्थळावर तक्रार नोंदवू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. स्टारचे चिन्ह असलेली 500 रूपयांची नोट बनावट नाही. चुकीच्या दाव्यासह नोट बनावट असल्याली अफवा व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:स्टारचे चिन्ह असलेली 500 रूपयांची नोट बनावट असल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य
Written By: Sagar Rawate
Result: False